कोंडय्या महाराजांच्या भक्तिमय गीतांची मेजवानी, माजी आमदार चटप करणार ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन




चंद्रपूर


 तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि विदर्भातील भाविकांचे जागृत दैवत श्री संत परमहंस कोंडया महाराज यात्रा महोत्सवाला १६ जानेवारीपासून सुरुवात होत आहे.या महोत्सवा दरम्यान महाराजांचा गीतांचा ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन होणार आहे.यात परमहंस कोंडय्या महाराज यांच्या जीवन चरित्र्यावर दास गणवीर लिखित स्रोतावर आणि स्वतंत्र गीतांचा यात समावेश असणार आहे.शेतकरी नेते तथा माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांच्या हस्ते या ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन होणार आहे.या सोहळ्यात सर्व भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थेचे कोषाध्यक्ष  रामकृष्ण सांगडे यांनी केले आहे.


भव्य खंजिरी भजन स्पर्धा


यात्रा महोत्सवात पालखीच्या दुसऱ्या दिवशी १७ व १८ जानेवारीला भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला सायंकाळी ९ वाजता खंजिरी भजन स्पर्धेचे उद्घाटन राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते होईल. या स्पर्धेत भजन मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन भजन स्पर्धा प्रमुख देविदास सातपुते, प्रवीण मेश्राम, दिलीप पुलगमकर, अभय यमनुरवार, विलास कावडे, नितीन चापले यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या