संतनगरीत भक्तीभावनेची मुक्त उधळण : पालखी महोत्वात हजारो भाविकांची गर्दी

 


चंद्रपूर 


महाराष्ट्र-तेलंगणा -आंध्रप्रदेश्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेले श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांच्या जन्म जयंती यात्रा महोत्सवाला आज पासून सुरवात झाली आहे. पहाटेला गावकर्यांनी गावात ग्रामस्वच्छता मोहीम राबविली. 



अशोक भस्की यांचे कोंडय्या महाराज यांच्या जीवन चरित्र्यावर प्रवर्चन झाले.मठाधीपती शेगमवार महाराज यांच्या हस्ते महासमाधीची विधिवत पूजा झाली. वारसान पुजारी श्रीमती अरुणा अंबेदवार यांनी आरती गायन केली.यानंतर पालखीचे प्रस्थान मंदिर परिसरातून झाले. गावातील प्रमुख मार्गाने पालखी फिरविण्यात आली.भजनाचा सुरात निघालेल्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 



या पालखीत 45 भजन मंडळ सहभागी झाले होते.ज्या मार्गाने पालखी गेली, त्या मार्गांवर पालखीत सहभागी झालेल्या भक्तांना अल्पोहार, चाय बिस्कीटची व्यवस्था केली. संत परमहंस कोंडय्या महाराज मंदिर परिसरात पालखीचे विसर्जन झाले. 



यावेळी झालेल्या कार्यक्रमात  माडूरवार,विजय देशमुख, राजू चिलमंतवार,बबन पत्तीवार, रामकृष्ण सांगडे, किशोर अगस्ती, अशोक रेचनकर, मनोज कोपावार,देविदास सातपुते, महेश सोनाकुलवार,अनिल कोरडे,संतोष बंडावार उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. रात्री भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या