मंदिर आणि मद्यालय यात काय फरक?




दुःखी माणूस मंदिरात जातो.. काही मागण्यासाठी.. पोरं होत नाही.. होऊ दे.. दुकान चालत नाही.. चालू दे.. लंग्न थांबलं.. परीक्षेत चांगले मार्क... चांगली बायको... काय.. काय.. मागण्या घेऊन नवस फेडतो... आता मद्यालय...इथे जाणारे 100 पैकी 99 माणसे दुःखी असतात... असं दुःख जे ते व्यक्त करीत नाही..मात्र मनात सारखं टोचत असतं.. एकदा दारू पोटात गेली... दुःखातून बाहेर... मांजर सुद्धा वाघासारखी डरकाळी फोडू लागते असं बळ दारू पिणाऱ्या माणसात संचारत... दुसरं अंन फार महत्वाचे असे की दुसऱ्याच्या दुःखाशी दारू पिणारा माणूस पटकन जुळतो..


एक चिनी कथा आहे... एका महिलेला चार मुलं असतात.. त्यांचं लग्न होते.. चार सुना घरी येतात मात्र एकही सून सासूला चांगल्या नजरेने बघत नाही.. सासूला अपमानित करण्याचा एकही क्षण सुना सोडीत नाही.. मुलं सुद्धा तेच करू लागतात.. चार सुनाबाबत सासूचा मनात कमालीचा क्रोध असतो.. पण व्यक्त होऊ शकत नाही.. एक दिवशी तिचा फारच अपमान केला जातो.. अपमान अस्सय झाल्याने ती घर सोडून बाहेर पडते. वाटेत तिला एक बौद्ध भिक्षु भेटतो. तिची कथा ऐकून भिक्षु तिला म्हणतो, हे दिसणारे मोडके घर.. या घराला दिसणाऱ्या चार भिंती.. या भिंतीना तू आपल्या चार सुना समज.. आणि मनातील आग बाहेर काढ.. ती महिला चार दिवस चार भिंतीला शिव्या देत राहिली.. मनात सुना बद्दल असलेली पूर्ण आग तीने भिंतीवर काढली... त्या चार भिंती कोसळल्या.. ती पूर्ण रिक्त होऊन घरी गेली.. आता सुना काही बोलल्या तर ती केवळ हसत असते...


तुम्हच्या मनातील आग दारू बाहेर काढते.. एखाद्या बद्दल राग असेल आणि तुम्ही दारू पिऊन असाल तर भांडण झालेच समझा... तुम्हचा मनात आहे ते दारू पिल्यावर ओठावर येते.. एका व्यक्तीने ठरविले की निवडणूक लढवायची.. आपल्या सोबततीला किती प्रामाणिक माणसे उभी आहेत हे त्याला बघायचं होत.. त्याने मटणाचे जेवण ठेवले... आलेल्या सर्वाना मनसोक्त दारू पाजली.. फुल्ल दारू पाजून झाल्यावर त्याने विचारलं... मी निवडून येऊ शकेल काय... सर्वांनी म्हटलं, तुझ्या सारखा नीच माणूस गावात नाही.. तुला एक मत सुद्धा मिळणार नाही... त्याने निवडणूक लढाविण्याचा विचार सोडून दिला... दारू तुम्हचा खरा चेहरा पुढे ठेवीत असते.. तुम्हाला रिक्त करीत असते.. पण अती झाले तर आधी तुम्हाला रस्त्यावर आणते आणि रस्त्यावरून थेट नरकात घेऊन जाते.


निलेश झाडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या