त्यांना चिंब भिजू द्या...!




पहिल्या पावसात पंख पिसारा फुलवून वेडसर होणाऱ्या मोरा सारखे ते आहेत... त्यांना नाचू द्या.. पिऊ द्या... जमीवर लोळत असले तर लोळू द्या..! आंनदात त्यांचा अणू-रेणू चिंब चिंब भिजू द्या... ते स्वतःला विसरतील इतकं बेफान होऊ द्या... मी अमुक आहे.. मी असा आहे तसा आहे... या जाती-धर्माचा आहे.. श्रीमंत -गरीब आहे.. सज्जन आहे... दुराचारी..याचा विसर पडू द्या.. हा विसर जेव्हा पडतो.. तो जेव्हा बेफान होतो...जेव्हा तो.. तो उरत नाही... तेव्हा मनात सुमधुर संगीत उत्पन्न होते... हजार फुलं फुलतात... यातून जो आनंदाचा झरा त्याचा मनात फुटतो... त्यात तो वर्षभर ओलांचिंब होत असतो...


 आज पालखी निघाली.. निघण्यापूर्वी एका सज्जन, प्रतिष्टीत व्यक्तीनं म्हटलं... पालखीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींना विनंती ...त्यांनी किमान डोक्यावर भगवी टोपी घालून मद्यालयात पाय ठेवू नका...त्यांचं काही चुकलं असं मला वाटतं नाही... प्रत्येकाचा मनात भक्तीचा आनंदकुंभ असतो.. या कुंभातील मद्य ( दारू ) प्रत्येकाना पिता येत नाही... ज्यांना येतंय ते बाहेरील दारू न पिताही बेफान होतात.. मस्त कलंदर.. फकीर.. जगासाठी हे शुद्ध पागल... पण प्रकाशाचा अगदी जवळ जाणारी माणसे...कारण नसताना ते हसतात.. नाचतात..कधी शांत शांत.. कधी अशांत.. पण ज्यांना ही दारू पिता येत नाही त्यांचं काय ? त्यांना बाहेरील दारू पिऊ द्या.. मनसोक्त नाचू द्या.. त्यांना *स्व* चा विसर पडू दया... दारूचा नशेत ते भांडतील.. वेडवाकडं बोलतील.. रागावू नका.. नुसतं बघत रहा.. त्यांचा बोलण्यात... त्यांचा भांडणात मजा शोधा...तुम्ही खदखदुन हसाल..त्यांचं नाचण.. बोलणं..मोठ्याने गाणे म्हणणं... यामुळे त्यांचा मनात साचलेली धूळ काही प्रमाणात उडविणारी ठरते... ते थोळफार का असेना स्वछ होतात...नदीचे पाणी माती भरलेल्या पोत्यानी अडवीता येत नाही... सतत वाहू द्या.. वाटेतील दगड, वळण नदीच्या पाण्याचा वेग कमी करीत असतात...त्या प्रमाणे मुक्त संचार करणाऱ्याना कधीतरी स्वतःचा चुकीची जाणीव होते... ज्यांना होते.. तो त्यांचा नवा जन्म असते.. हे तेव्हाच शक्य आहे.... जेव्हा कुणी त्यांना अडविणार नसतं...तेव्हा एकतर त्यांचं अस्त्तीत्व समाप्त होते किवा नवा चेहरा घेऊन ते पुढे येतात...


Nz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या