पवित्र मंदिरावर संभोग शिल्प कसे?

 


मदिरा से मंदिर तक...!



' काम ' म्हणजे एखादे कार्य ( वर्क ). या काम शब्दाचा मागे ' वासना ' हे शब्द जोडले तर ' कामवासना ' शब्द होतो. हा शब्द प्रत्येकाला हवाहवासा पण अंधारात, उजेडात अनेकांना नकोसा असणारा हा शब्द.आपल्या प्राचीन ग्रंथानी कामवासनेला पाप मानलं.हा समज एवढा दृढ झाला की अध्यात्मिक प्रवासात कामवासना पहिला शत्रू झाला.खरा प्रश्न हा की, सत्याचा शोधात खरंच कामवासना अडसर ठरू शकते का? कामवासना अडसर ठरणारी असती तर पवित्र समजल्या जाणाऱ्या मंदिरावर मैथून शिल्प ( संभोग शिल्प ) का कोरले गेले असावे? त्याकाळी आजच्या सारखी साधने नव्हती. शिल्पातून बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केला गेला.मैथून शिल्प नीट बघितलं तर ही शिल्पे कामवासना जागृत करणारी आहेत. काही असं म्हणतात, की तुम्हचा मनातील अश्लीलता बाहेर ठेवून पूर्ण शुद्धीने मंदिरात पाय ठेवावे.. ही शिल्पे तुम्हचा मनातील वासना बाहेर ठेवण्याचा संदेश देतात. वास्तविकता हे चुकीचे आहे..मंदिरावर असलेल्या संभोग शिल्पाचा एवढा अर्थ, आहात तसे आत जा... मग मनात वासना असली तरी काही हरकत नाही.. ही शिल्पे तुम्हाला तुम्हचा मनातील वासने दर्शन घडवितात. वासनेचा स्वीकार करणे म्हणजे मुक्तीचा मार्गांवर टाकलेलं पाहिलं पाऊल असतं. वासना केवळ शारीरिक नसते.. प्रत्येक तीव्र इच्छा, आहे त्यापेक्षा अधिक मिळविण्याची असूरी धावपळ ही सुद्धा वासना आहे..यातून मुक्त होणे खरंतर कठीण आहे.. यातून मुक्त होण्याची केविलवाणी धळपळ करण्यापेक्षा याकडे जागृतपणे बघणे सोईस्कर ठरते... उरलं कामवासना...ही वासना नाही.. केवळ काम आहे.. कार्य.. असं ज्यात केवळ आनंद आहे..पण तेव्हा जेव्हा तुम्ही तुम्हचा जोडीदाराशी प्रामाणिक असाल...


निलेश झाडे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या