मदिरासे मंदिर तक..
मृत्यू नंतर स्वर्ग मिळतं असेल तर तुम्ही जीवन जगता कश्याला? जीवन सुख, दुःखाचा संगम आहे. जिथे सुख आहे तिथे दुःख आहे. यातून मुक्त होण्याचा मार्ग मृत्यूत असेल तर जगण्याआधीच मृत्यूचा दारावर का उभे होऊ नये? मृत्यूनंतरच स्वर्ग किवा नरक मिळत असेल तर जीवनाचा काय अर्थ? ज्या दिवशी तुम्हचा जन्म झाला, त्याच दिवशी खरंतर तुम्ही मृत्यूला कवेत घ्यायला हवे... एकीकडे स्वर्ग हवे... दुसरीकडे मृत्यू नको... कुठल्याच धर्मशात्रात हे बसणारे नाही... असं म्हणतात की कर्मा नुसार स्वर्ग, नरक ठरत असते.. आजची स्तिती बघीतलं तर नरकात पाय ठेवायलाही जागा उरली नसेल.. धर्मशात्रा नुसार केवळ तीन नरक आहेत... किती गर्दी झाली असेल तिथे.. अश्या गर्दीत कोण जाईल... स्वर्गात सुद्धा हीच स्थिती.. अश्यात आपली पृथ्वी बरी...
आता ज्याला फारच अकुशल कर्म समजल्या गेले.. किवा पापाची पायरी असे मानलं गेले... ती कृती म्हणजे संभोग.. वास्तविक ही कृती नव्या जीवाला जन्म देते.... ही कृती वाईट कशी होऊ शकते? खरंतर संभोग ही क्रिया दोन जीवांना एक करीत असते.. ज्या क्षणी मानव असो प्राणी... दोघे एक होतात.. त्यावेळी त्यांचा अहंकार ( मी मोठा की तू मोठा ) पिकल्या पानासारखा गळून पडतो.. दोन श्वास एक होतात... हा तो क्षण जेव्हा मी पणा नाहीसा होतो... आपण एक आहोत ही भावना जागृत होते.. आनंदाचा डोहात दोघेही खोल खोल दुबकी मारतात.. आनंद तरंग.. शरीराचा प्रत्येक अवयव परम आनंदात चिंब भिजून निघतो.... मनाच्या कोपरा कोपरा सुगंधाने गंधाळून निघतो... अंधारातही उजळून टाकणारी ही पौर्णिमा असते..
शोकांतिका अशी.. आनंदाचा डोह असलेल्या संभोगाकडे प्राचीनकाळापासून तुच्छ नजरेने बघितलं गेले.. आज सुद्धा कामवासेनेवर चार चौघात कुणी बोलायला तयार नसते.. जेव्हा की या आनंदात दुबकी मारायला पुरुष एका पायावर उभा असतो.. उतावीळ असतो.. खरंतर हे स्वर्ग सुख आहे... केवळ अट एवढीच दोन्ही जीव.. जे एक होतात... त्यांचे अगदी हृदयातून प्रेम असणे गरजेचे.. शारीरिक संबंध प्राणी सुद्धा करतात.. पण त्यांचा एक मोसम असतो.. त्यांचे संबंध केवळ नव्या जीवाच्या निर्मिती पुरतं मर्यादित असते..
माणसाने मात्र ही सीमा ओलांडली... जिवाच्या निर्मिती सोबतच त्याने इथेही आनंद शोधला... हा आनंद मिळविण्यासाठी तो अमानुष झाला, अत्याचारी झाला... इथे कामवासना आली.. जिथे वासना असते.. तिथे प्रेम, आनंद नसते... प्रेमापासून सुरु झालेला अन वासानेवर येऊन थांबलेला हा प्रवास नरक ते स्वर्ग असा प्रवास आहे.... आनंद तुम्हाला हळूहळू स्वर्गाचा दिशेने घेऊन जातो... कामवासना नरकाकडे...
निलेश झाडे


0 टिप्पण्या