भाजपचा वाटेवर काँग्रेस, जिल्हा परिषद निवडणूक





तोहोगाव-धाबा क्षेत्राचा मागील पंधरा वर्षाचा इतिहास बघितला तर असं लक्षात येईल.. इथे बाहेरचे ( तोहोगाव-धाबा क्षेत्र वगळता ) निवडून आलेत. हे क्षेत्र भाजपसाठी विजयाची हमीभाव ठरले. आता काही महिण्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पक्षाने स्थानिक चेहरा दिला आहे. ( तशी चर्चा आहे ) म्हणजेच तोहोगाव-धाबा क्षेत्रातील.नाव ठरलं असं बोललं जात आहे. दुसरीकडे काँग्रेस मात्र तोहोगाव-धाबा क्षेत्रा बाहेरील चेहरा शोधत असल्याची चर्चा सुद्धा आहे. कधी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या क्षेत्रात भाजपचा पाय खोलवर रुजला आहे. कधी भाजपने वापरलेली राजकीय खेळी खेळण्याचा तयारीत आता काँग्रेस दिसत आहे.समविचारी पक्षांसोबत काँग्रेस युती करणार, असं बोललं जातं. युती झाली तर नक्कीच भाजपचा जिथे सहज विजय होता, तिथे थोळी मेहनत घ्यावी लागेल. पंचायत समितीचे उमेदवार निवडताना फारच बारकाईने अभ्यास करावा लागेल. कारण पंचायत समितीच्या उमेदवारामुळे पन्नास टक्के पेक्षा अधिक प्रभाव जिल्हा परिषदेच्या निकालावर पडेल. आता जुना कार्यकर्ता म्हणून डोळे बंद करून पंचायत समितीची उमेदवारी दिली तर भाजपला हा निर्णय फारच मारक ठरणारा असेल.हेच काँग्रेसला सुद्धा लागू होईल. केवळ निवडणूक डोळ्यापुढे बघून लोकांशी गोडगोड बोलणारा उमेदवार कितीही जुना असला तरी पक्षाने त्याला टाळलेलं बरं.


मागील या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणुकात काँग्रेस पक्ष आपटला. याला या क्षेत्रातील कार्यकर्ते कारणीभूत ठरल्याची चर्चा होती. काही मोजक्याच लोकांचा होती सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्या गेले. त्यामुळे काही ( अनेक ) कार्यकर्ते नाराज झालेत.ते पक्षाशी एक निष्ट राहिले मात्र ज्या तळमळीने कार्य करायला हवे होते ते त्यांनी केले नाही. निवडणूक प्रचाराला दरम्यान हा बाहेरचा असा प्रचार करणाऱ्या काँग्रेसवर आता बाहेरचा ( तोहोगाव-धाबा क्षेत्र वगळता ) चेहरा पुढे करण्याची वेळ ओढवली आहे. दुसरीकडे भाजपात सध्या कार्यकर्ते कमी ठेकेदार अधिक, अशी स्तिथी आहे.भाजप या कार्यकर्त्यांना कसं सांभाळते यावर बरेच काही चित्र स्पष्ट होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या