उद्याची चिंता एवढी तीव्र असते.. आज.. आता.. म्हणजे वर्तमान आपण विसरून जातो...वर्तमानाला मन शत्रू मानीत असतो... मन.. भूतकाळ.. भविष्यकाळात जगतो.. त्याला वर्तमानकाळ नको असतो.. आपण म्हणतो उद्या जगू... आपल्या प्रमाणे... उद्याची प्रतीक्षेत आपण वर्तमान स्थितीपासून दूर जातो... उद्या उगावायचा आधीच मृत्यू येतो... उद्याचा प्रतीक्षेत आजचा जगण्यापासून आपण वंचित होतो... उद्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा आज.. आता.. जसे आहात.. तसे स्वीकारा... तसे जगा.. या जगण्यात वेगळा आनंद आहे.. बाहेरच्यांना हा आनंद दिसत नाही एवढं.. तुम्ही भविष्यात जसे होता.. तसेच बाहेरच्यांना दिसालं... त्याचा व्यवहार अगदी तसाच असेल.. जसा आधी होता.. तुम्हचा मनात आनंदाची उटलेली लहर त्यांना दिसणार नाही... त्याचा अनुभव केवळ तुम्ही घेऊ शकता.. या आनंदाचा अर्थ असा नाही की आता तुम्हची सर्व परस्थिती बदलेल... अशी अपेक्षा वाऱ्याला कैद करण्यासारखी आहे.. वारा कैद होत नाही... मात्र हा आनंद तुम्हाला एकाग्रता देतो... आता तुम्ही चिंता करीत नाही.. चिंतन करता... चिंतनातून मार्ग निघत असतो.. चिंतेने मार्ग निघत नाही उलट चिंतेचे भार अधिक होते... हा भार अस्यय झाला की माणसे आत्महत्या करतात... खरा प्रश्न हा की त्यांची सुटका झाली का? माणसाच्या वृत्तीचा अभ्यास नीट केला तर लक्षात येईल की, तुम्ही गेलात तरी ते तुमच्या कुटुंबाला सोडणार नाही... आधी त्यांचा तगादा तुमच्याजवळ होता.. आता तुम्हचा कुटुंबाकडे... जाताना कुटुंबाला दुःखाचे ओझे देऊन जाणे हे कर्तव्याला धरून नाही... मृत्यूचा जवळ जाण्यापेक्षा त्याचा सामना करणे हे खरे पुरुषार्थ आहे... संघर्ष करताना तुम्हाला मृत्यू आला तर लोक म्हणतील लढता, लढता मेला... आत्महत्या पालायन आहे... स्वर्ग, नरकाला मी मानीत नाही.. जर असेल तर आत्महत्या करणारा माणूस नक्कीच नरकात जाईल... लोकांना असं वाटतं की मी पुन्हा काही वर्ष जगलो पाहिजे... तिथे तुम्ही आत्महत्या करता? पृथ्वीवर तशी ही माणसांची गर्दी वाढली आहे... तुमच्या जाण्याने एक जागा रिक्त झाली.. कुणी तरी नवीन माणूस तुमची जागा घेईल... पण तुम्हच काय? तुम्हच जगणे पूर्ण झालं कुठं होतं... आनंदाचा दिशेने तुम्ही पाऊल उचललं नव्हतं... जन्मास येणारा माणसाचा खांद्यावर कर्तव्याचे ओझं असतं.. या ओझ्यातून मुक्त कुठं झाला तू...! तुला आसपासच्या माणसांना प्रेमाचा पावसात ओले चिंब करायचे होते... तू केलास का...नाही.. ना... तुझ्या मरणाला काय अर्थ उरला....!
जेव्हा तुम्ही जागरूक होता तेव्हा तुम्हचा भूतकाळ ( तुम्ही केलेल्या चुका ) तुम्हचा पुढे वर्तमान होऊन उभा होता.. हे फारच दुःखदायक आहे... अतिशय शांतपणे यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला हवा... हा काढ तुमची परीक्षा घेणार असतो.... अपमान, राग, द्वेष,क्रोध तुम्हच्यावर आक्रमन करतात... जवळची माणसे फार दूर जातात... तुम्ही केवळ एकटे असता... इथून बाहेर पडले की जग तुम्हचे असते... आता तुम्हाला जगाची गरज नाही... जगाला तुम्हची गरज वाटते...
शेवटी आत्महत्या... नपुसंक वृत्तीतून जन्मास येते...!
निलेश झाडे
.jpeg)

0 टिप्पण्या