तुम्हच्या प्रार्थना ऐकतो कोण?




गुड मार्निंग म्हटल्याने कुणाचा दिवस गोड गेला ? मंगल हो म्हटल्याने कुणाचे मंगल झाले ? दोन व्यक्ती, एक नास्तिक, एक आस्तिक...आस्तिकाची प्रार्थना देवाने ऐकली म्हणून तो सुखी असेल तर..नास्तिकाची प्रार्थना कुणी ऐकली की तो सुखी आहे? जिव हत्या पाप असेल तर पृथ्वी पापी लोकांची गर्दी आहे, असे म्हणावे लागेल.. जो जीवांना प्रेम करतो तो आणि जो जीवाची कत्तल करतो दोघे ही सुखीच आहेत... तुम्हची प्रार्थना कुणी ऐकली असती तर काही अनेक जोडपे मुला पासून वंचित नसती.. तुम्हची प्रार्थना ऐकली गेली असती तर, ज्यांना मुलगा हवा त्यांना तीन तीन चार चार मुली नसत्या...कुणी दुःखी नसतं....तुम्ही आहात त्या स्तिथीत आज नसता जर तुम्हची तुम्हची प्रार्थना ऐकणारा कुणी या जगात असता तर... कथा, पुराण सांगणारे कित्येक महाराज जेलमध्ये सडत आहेत...का ?  याचा शोध घ्यायला हवे... कैदी असूनही ते दुःखी नाही... त्यांना सुविधा मिळतं आहेत.. ( चर्चे नुसार ) कोण तुम्हाला दुःखी करतो.. कोण तुम्हाला सुखी करतो...

या जगात लावल्या गेलेल्या 100 शोधापैकी 99 शोध नास्तिकानी लावले आहेत...नास्तिकानी समाजात बद्दल घडवीला,नास्तिकानी क्रांती केली... कारण नास्तिक भयमुक्त असतो... शेवटचा क्षणी आस्तिक कुणी तरी आपल्यावर कोपेलं, पाप लागेल म्हणून एक पाय मागे घेत असतो... आस्तिकापेक्षा नास्तिक केव्हाही बरा...नास्तिक माणूस माणसाला  अधिक महत्व देत असते...तर आस्तिक देवाला... जे नाही त्याचा मागे नास्तिक धावत नाही...आस्तिकाचे या उलट असते... जे नाही त्याचाच मागे हा धावत असते....नास्तिक असणे म्हणजेच जागृत असणे होय...नास्तिकचा मनात फारच जलदगतीने सत्याचा द्विप प्रज्वलीत होत असतो... निसर्ग नास्तिकाला अधिक जवळ करीत असतो.. जसे अनेक जीव तसे आपण... जेव्हा इत्तर जिवापेक्षा आपण स्वतःला वेगळं समजू लागतो तेव्हा आपण निर्मित केलेला सुज्ञ, विचार करणारा माणूस होतो... इथेच तुम्हची प्रार्थना थिटी पडते....प्रार्थनेला अर्थ उरत नाही....


निलेश झाडे


nz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या