28 जानेवारी, महाराष्ट्रातील केवळ एक नेता नाही तर मनामनात घर केलेला माणूस कायमचा जग सोडून गेला. महाराष्ट्र कामाचा माणसाला कायमचा मुकला.उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचे वृत्त येताच केवळ बारामती नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील माणूस हळहळला.राज्य सरकारने तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला.दुखवटा संपायला अजून पाच तास उरले आहेत. या दरम्यान बारामती, मुंबई येथे अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्या राजकीय असल्याने त्यांच्यावर बोट आपण ठेवू शकत नाही. मात्र शासकीय विभाग, असा विभाग जो शिस्तीसाठी ओडखला जातो, तो चुकत असेल तर याला केवळ मुजोरी म्हणता येईल.
चंद्रपूर वाहतूक शाखेत एका कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.ते ही वाहतूक शाखेचा कार्यालयात.याला काय म्हणायचं? केवळ पाच मिनिट उशीर पोहचलेल्या वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यावर कार्यवाही करणारे जिल्हा पोलीस अधीक्षक आता काय भूमिका घेतात हे महत्वाचे. हे खरे, पोलीस जागतात म्हणून सामान्य माणूस निवांत झोपी जातो. गाव, शहर, राज्यात शांतता असते, असा विश्वास सामान्य माणसाला आहे. म्हणूनच पोलीस विभागाचा प्रत्येक लहान, मोठ्या चुका सामान्य माणूस पोटात घालीत असतो. त्यांचा सन्मान करीत असतो. मात्र एकीकडे आपल्या आवडता नेता गेल्याचे दुःख असताना पोलिसांची ही कृती एखाद्याचा मरणावर हसण्यासारखी ठरली आहे.


0 टिप्पण्या