काँग्रेसचा पराभव झाला की समाजमाध्यमात एक सूर उमटतो, काँग्रेस बुडत जहाज आहे. बरं झालं या जहाजाचे कॅप्टन राहुल गांधी आहेत. या माणसात काही तरी खास आहे.हा हरला तरी याचा पाठीशी मोठा जण समुदाय असतो. फार मोठा असूनही अगदी सामान्य माणसाचा गर्दीत सहजरित्या एकजीव होतो.याचमुळे राहुल गांधी हवाहवासा वाटतो.
काँग्रेस बुडत जहाज नव्हतच कधी, वेळ वाईट सुरु आहे, एवढंच. किवा तुफानात अडकलेलं जहाज म्हणू. या तुफानाशी सामना करून जेव्हा हे जहाज सुखरूप बाहेर पडेल, तेव्हा पृथ्वीवरील सर्व समुद्राच्या सीमा या जहाजापुढे थिट्या पडतील. हे ही खरे केवळ कॅप्टन चांगला असून चालत नाही, त्यांचा मदतीला येणारे इत्तर माणसे तेवढेच कुशल किमान जहाजा प्रति प्रामाणिक असायला हवेत. बुडणाऱ्या जहाजाला एक व्यक्ती वाचवू शकत नाही.दुदैव असं काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर मी मोठा, तू मोठा अशी स्पर्धा सुरु आहे. किमान चंद्रपूरातील चित्र तसंच आहे. इथे काँग्रेस विरोधात काँग्रेस उभी झाली आहे. केवळ स्वतःचा मोठापणा सिद्ध करण्यासाठी. खरंतर पक्ष वाढविण्यासाठी आपली ' प्रतिभा ', हुशारी, बुद्धिमत्तेचा योग्य वापर करायला हवा होता, इथे वेगळंच सुरु आहे.जेव्हा दोन वाघ भांडतात तेव्हा एकाचा बळी ठरलेलाच, मात्र या भांडणाचा फायदा तिसरा वाघ सहजपणे उचलित असतो.चंद्रपुरात ' विजय ' कुणाचा होणार, हे काही दिवसात पुढे येईल. पराभव झाला तर बुडत्या जहाजाला मोठं भोक पाडणारे जहाजातील माणसे अधिक कारणीभूत ठरतील
.jpeg)

0 टिप्पण्या