वाहतूक शाखेत हेड मोरर पदावर कार्यरत असलेले रोशन गाडे यांचा वाढदिवस चक्क कार्यालयात साजरा करण्यात आला.केव्हा तर राज्यात दुखवटा होता तेव्हा.एकीकडे राज्यात दुखवटा दुसरीकडे पोलीस कार्यालयात आनंद साजरा.वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यालयचं मिळालं? याला कुणी परवानगी दिली? ही योग्य वेळ होती काय ? ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाडगता कर्तव्य करणारे पोलीस बांधव आणि थेट कार्यालयात केक कापणारे हे वाहतूक विभागाचे कर्मचारी? काय म्हणायचे यांना? विशेष म्हणजे सिग्नलवर एक मिनिट उशिरा पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करून आपण कर्तव्यदक्ष असल्याचा पुरावा पुढे ठेवणारे जिल्हा पोलीस अधीक्षक याबाबत स्वतःच्या विभागातील या कार्यक्रमावर कोणती कारवाई करणार ? याकडे आता चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या