मदिरासे मंदिर तक...
हसणारा बुद्ध...त्याचे हसणे.. निर्वानास प्राप्त झाले...
हसणे अगदी सामान्य कृती.. हास्य आपल्या चेहऱ्यावर तेज निर्माण करते... मनाला हलकं करीत असते.. मनाचा अगदी आत.. आत घेऊन जाते...याला पैसे लागत नाही.. विनामूल्य... असं म्हणतात की मोफत मिळालेल्या पदार्थाला फार महत्व नसते.. तसेच हास्याचे.. विनामूल्य मिळाले असले तरी अनेकजण यापासून फार दूर असतात... काही... तर असे.. वर्षनुवर्षे हसतच नाही... धीरगंभीर असावे पण गंभीर नसावे...धीरगंभीर म्हणजे ज्यात ज्यात धीर आहे.. जागरूकता आहे... गंभीर म्हणजे चिंता... कधीतरी हसावे...काय चिंतेची.. चिंता करायची कश्याला...! एकदा डोळ्यातून अश्रू बाहेर येईल.. एवढं हसा... हसणे सोपी गोस्ट नाही.. केवळ पवित्र हसण्याने होतेई निर्वानास प्राप्त झाला... आज जगातील 70 टक्के घरात होतेईची मूर्ती असते... हाच तोच होतेई ज्याला आपण हसणारा बुद्ध म्हणतो...लाफिंग बुद्ध...
लाफिंग बुद्धा यांना होतेई किंवा पुताई म्हणूनही ओळखले जाते, ते एक बौद्ध भिक्षू होते ज्यांना चीन आणि जपानमध्ये सुखाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते.असे मानले जाते की बौद्ध धर्माची शिकवण प्राप्त केल्यानंतर होतेई यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर ते मोठ्याने हसू लागले. त्यांच्या हास्याने लोकांना आकर्षित केले आणि ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी लोकांना हसणे आणि आनंदी राहणे शिकवले. या कारणास्तव त्यांना जपानमध्ये ‘लाफिंग बुद्ध’ म्हटले जात असे.जेव्हा ते लोकांमध्ये असायचे तेव्हा पोट दाखवून जोरजोरात हसायचे आणि वातावरण प्रसन्न करत असायचे.ते जिथे जायचे तिथे लोकांना इतकं हसवायचे की तिथली नकारात्मकता पूर्णपणे नाहीशी होत असे.
होतेई यांच्या अनुयायांनी त्यांचा अशा प्रकारे प्रचार केला की चीन आणि जपानचे लोक त्यांना देव मानू लागले आणि त्यांची मूर्ती बनवून घरात ठेवू लागले. कालांतराने लाफिंग बुद्धा हे सकारात्मक ऊर्जा, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाऊ लागले.
निलेश झाडे


0 टिप्पण्या