दोन दिवस उलटले, कार्यवाही शून्य : वाहतूक कार्यालयात वाढदिवस साजरा




चंद्रपूर 


वाहतूक शाखेत हेड मोरर पदावर कार्यरत असलेले रोशन गाडे यांचा वाढदिवस वाहतूक विभागाचा कार्यालयात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे सिग्नलवर एक मिनिट उशिरा पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करणारे पोलीस अधीक्षक याबाबत स्वतःच्या विभागातील या कार्यक्रमावर अद्याप कार्यवाहीचा बडगा उचललेला नाही. ही सूट त्यांनी का दिली कळायला मार्ग नाही.कार्यवाहीस होत असलेली दिरंगाई आता चर्चेचा विषय ठरली आहे.


तुम्ही चुकलेच


 शिस्त, वेळपालन आणि कडक नियमांची अंमलबजावणी ही वाहतूक शाखेची ओळख असताना, कार्यालयीन वेळेत किंवा कर्तव्यावर असताना वाढदिवस साजरा करणे कितपत योग्य,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याचे उत्तर पोलीस विभागाला द्यावेच लागणार आहे, किंबहुना ते विभागाचे ते प्रथम कर्तव्य ठरेलं.



तोंड बघून कार्यवाही नको..


 उशिरा ( एक मिनिट ) कर्तव्यावर पोहचलेल्या महिला वाहतूक विभागाचा कर्मचाऱ्यावर कार्यवाही करून चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांनी आपली जागरूकता, कर्तव्यदक्षता जिल्ह्यातील जनतेपुढे ठेवली. या प्रकरणात त्यांची कर्तव्यदक्षता जनतेपुढे यायला हवी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या