खरंतर सार्वजनिक आयुष्य जगणारा माणूस लवचिक असावा. मनात कितीही घाण साचली असली तरी वाणी गोडं असावी. भाषा मृदू असावी. यामुळे काय होतोय की तुम्हचा खरा चेहरा मग तो कितीही विद्रुप असला तरी तो चेहरा फार जलदगतीने पुढे येत नाही. हळुहळू पुढे येतो. पण तो येतोच. त्याचे परिणाम फार दिवसांनी दिसू लागतात. मात्र ज्यांच्यात इगो असते त्यांचा खरा चेहरा फारच लवकर पुढे येतो. मंचावर ' रडून ' ज्यांनी युद्ध जिकलं ते स्वतःला मोठे योद्धा समजू लागले होते. माझ्याच रक्तातील माणसांनी मला खुर्ची मिळवून दिली हा गैरसमज त्यांना झाला. ज्यांनी अगदी मनातून मदत केली त्यांना रस्त्यावर पडलेल्या कचराप्रमाणे उचललं आणि त्यांनी फेकून दिलं.हा इगो इथेच थांबला असता तर बरं झालं असतं. पण डोक्यात हवा गेलेला व्यक्ती जमिनीला फार महत्व देत नाही. पण त्याला हे कळत नाही की आज ना उद्या मला जमिनीवरच पाय ठेवावे लागणार आहे. विधानसभेचा निवडणुकीत जनतेनी त्यांना जमिनीवर आणलं. तरी ही इगो गेला नाही. चंद्रपूर शहराची सत्ता आयती चालून आली होती. आपल्या नासलेल्या प्रतिभेमुळे ती सत्ता ही गमावली. खरंतर ही तिच वेळ होती, आपली प्रतिभा उंचाविण्याची, जनतेचा आशीर्वाद मिळवण्याची, अख्या जिल्ह्यात उजळलेला चेहरा घेऊन मिरवण्याची. पण इगो इथेही आळ आला. जिल्हातच नव्हे तर राज्यात त्यांचा खरा चेहरा पुढे आला.ही माणसे केवळ सत्तेची भुकेली आहेत.याची प्रचिती जनतेला आली.
आता चंद्रपूरचा ' विजय ' दूर का पडाला. राज्याचे नेतृत्व करण्याचा ' तोरा ' मिरवणारा, एक पाऊल मागे घेण्याचा मोठापणा दाखवू शकला नाही. वाघा सारखी डरकाळी फोडून, उत्तेजित करणारे भाषण दिल्याने कुणी मोठा होत नाही. फार फार तुम्हच्या प्रसिद्धीत वाढ होईल. एखाद्याचा हट्टी स्वभावाने आपल्या घराचे नुकसान होत असेल तर अश्यावेळी शहाणा माणूस माघार घेतो. अश्या माणसाला मोठ्या मनाचा म्हणावा.पण हे नेते स्वतःचा हट्ट पुरविण्यासाठी ज्या घराने त्यांना आसरा दिला, त्याचाही बळी घेतील. अश्या लोकांचा पाठीशी जनता का उभी होते, हेच कळायला मार्ग नाही. यांच्या संतरंज्या उचलण्यापेक्षा हवेत उडणाऱ्या या तथाकथित मोठ्या नेत्यांना जमिनीवर आणणे हे महत्म कार्य ठरेल.
निलेश झाडे


0 टिप्पण्या