एक वस्तू, ज्यामुळे हिंदू राजवंश बुद्धिस्ट ठरला

 


एक अतिशय साधी घटना चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात घडली. वरवर ही घटना अगदी सामान्य दिसली मात्र या घटनेने महाराष्ट्राचा इतिहास बदलवून टाकला, हा इतिहास होता वाकाटक साम्राज्याच्या.वाकाटक, महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो.या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २००च्या सुमारास होऊन गेला.वाकाटक राजघराणे ब्राह्मण राजवंश होते, असे इतिहासकारानी म्हटले आहे, आजही म्हणतात.या राजवंशाने अनेक बौद्ध लेण्यासाठी दान दिले आहे. बुद्ध धम्माचा प्रसार, प्रचारासाठी त्यांचे कार्य मोठे. शिलालेखातून ते आपल्याला दिसतेय. तरी या वंशाला ब्राम्हण ठरविले गेले. केवळ भारतीय इतिहासकार नाही तर विदेश्यातील इतिहासकारांनी तोच धागा पुढे ओढला. सत्य फारकाळ लपू शकत नाही, याचा प्रत्यय महाराष्ट्राला आला. राज्याचा शेवटचा टोकावर असलेल्या एका गावात अशी प्राचीन वस्तू सापडली, त्यामुळे वाकटक बौद्ध होते, हे सिद्ध झाले. गोजोली येथील प्रकाश उराडे यांचे निधन झाले.त्याचे एक संदूक होते. यात त्यांनी आपल्या काही वस्तू जतन करून ठेवल्या होत्या. त्यांचा निधना नंतर त्यांच्या मुलगा रंजित याने तो संदूक उघडला.त्यात काही नाणे आणि तांब्याची गोलाकार वस्तू होती. या वस्तूचा इतिहाससमोर आला अन सारेच अवाक झाले.ती साधीसुधी वस्तू नसून चक्क राजमुद्रा निघाली. वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा पृथ्वीसेन द्वितीय यांची ती राजमुद्रा आहे. पाचव्या शतकातील वाकाटकांची ही राजमुद्रा चंद्रपूर जिल्हाच्या प्राचीन इतिहासात भर घालणारी ठरली.

या सोबतच वाकटक कोण, याचा उलगडा करणारी ठरली.उराडे यांनी जतन करून ठेवलेली ती वस्तू वाकाटक राजवंशातील शेवटचा राजा पृथ्वीसेन व्दितीय यांची राजमुद्रा होती. पृथ्वीसेनाचा कालखंड इ.स.475-495 होता. पृथ्वीसेन यांचे ताम्रपट बालाघाट, मांढळ, माहूरझरी येथे मिळाले आहेत. या राजमुद्रेवर सुरुवातीलाच बोधिसत्व ताराचे चित्र कोरले आहे. त्याखाली ब्राम्ही लिपीत लेख कोरला आहे. या लेखात नरेंद्रषेण यांचा पुत्र पृथ्वीषेणा यांची ही राजमुद्रा असे लिहिले आहे.ही राजमुद्रा नागपूर येथील संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. वाकाटकांनी अनेक बुद्ध लेण्या कोरल्या, दान दिले. तरीही त्यांना बुद्धिस्ट मानायला इतिहासकार तयार नाही.गडचिरोली जिल्हात येणाऱ्या मुलचेरा येथे वाकटक कालीन बौद्ध स्तूप मिळाला. भन्ते नागार्जुन सुरेई ससाई यांनी येथे भेट दिली. मिळालेल्या वस्तू वरून ही बुद्ध स्तूप आहे सिद्ध झाले होते. मात्र भारतीय पुरातत्व विभागाने त्याचा उल्लेख  मंदिर असा केला आहे. भद्रावतीत वाकाटकांचे शिलालेख सापडले.महाराष्ट्रातील अनेक लेण्यांची निर्मिती वाकाटकांनी केली. तरीही ते बुद्धिस्ट होते हे मानायला इतिहासकार तयार नाहीत. बुद्धाचा आणि त्यांचा धम्माचा इतिहास पूर्णपणे नष्ट करण्याचे टोकाचे प्रयत्न केल्या गेले, प्रत्येक वेळी बुद्ध आणि त्याच्या धम्माचा इतिहास अधिक तीव्रतेने जगापुढे आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या