खरे चोर कोण? राशन दुकानातील तांदूळ तस्करी

 



देश्यातील गरिबी कमी झाली, ही ओरड सत्ताधारी करतात. दुसरीकडे राशन दुकानातील तांदूळ, गहू यांच्यावर जगणारे करोडो नागरिक देश्यात आहेत. काही राशनधारक राशन दूकानातील तांदूळ घरी नेत नाहीत.थंब मारतात आणि तांदळाचा मोबदल्यात पैसे घेतात, अशी चर्चा आहे.ही चर्चा खरी असेल तर त्यांचा तांदूळ जातो कुठे? हा तांदूळ व्यापारी उचलतात.राशन दुकानदाराचा विरोधात तक्रार करायची मुभा सुद्धा यात नाही. सर्व लीगल प्रोसेस नुसार हा व्यापार चालतो. जेव्हा या तांदळाने भरलेला ट्रक किवा कुठलेही वाहन जप्त होते, तेव्हा तांदूळ कुठून आला याची चर्चा होते. गोंडपिपरी तालुक्यात हा व्यापार फारच फोफावलेला आहे. जनता विद्यालय परिसरात चार ते पाच व्यापारी असल्याची माहिती एका मित्राने दिली, ही कितपत खरी याची चौकशी पोलीस विभागाने करावी. नुकतेच गोंडपिपरी पोलिसांनी अवैध तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कार्यवाही केली. काही तथाकथित समाजसुधारकांनी यातील आरोपीकडे आपला ' भामटा ' पाठविला. त्याने लाखोची मागणी केली.आरोपीने त्यांना त्यांची लायकी दाखविली, ही चर्चा आज गोंडपिपरी शहरात ऐकायला मिळाली.याचे कुठलेच पुरावे माझ्याकडे नाहीत,ऐकलेल्या चर्चेवरून मी लिहीत आहे. हा प्रकार तहसील कर्मचाऱ्यांना दिसत नाही का? दिसत असूनही हे डोळे बंद ठेवतात. गोंडपिपरी तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी रेती तस्करापुढे अतिशय हतबलतेने बोलताना मी बघितलं आहे. हे काय कार्यवाही करतील? पोलीस विभागाने आपलं काम केलं, महसूल विभाग आता काय करणार, याकडे लक्ष लागले आहे. केवळ तांदूळच नाही, गोंडपिपरी तालुक्यात होणारी रेती तस्करी, खनिज चोरी याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या