संतनगरी अशी ओडख असलेल्या धाबा गावातील मुख्य मार्गांवर ( हा मार्ग pwd अंतर्गत येतो ) खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी ट्रॅक्टरने विट्याचे तुकडे टाकण्यात आले.चार ते पाच ट्रिप टाकल्या गेले. jcb ने मार्ग समतोल करण्यात आला. यात फारफार दहा हजाराचा खर्च झाला असेल. मात्र देयक दोन लाखाचावर काढण्यात आले आहे. माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या कागदपत्रातून ही माहिती पुढे आली आहे. खर्च करण्याची ही कुठली शासकीय पद्धत हेच कळायला मार्ग नाही.
संतनगरी अशी ओडख असलेल्या धाबा ग्रामपंचायतेत 80 लाखाचा कथित भ्रष्टाचाराची चर्चा रंगली आहे. 15 वित्त आयोगातील निधीचा नियमाना डावलून वापर केला गेला आहे. सन 2025 मध्ये लाखो रुपयाचा वस्तू घेतल्या गेल्यात.तसे देयक आहेत. प्रत्यक्षात या वस्तू सन 2026 ग्रामपंचायतेने लोकांपुढे ठेवल्या. वर्षभर या वस्तू कुठे होत्या? एक लाखात होणाऱ्या कामाचे देयक तीन लाखाचावर काढण्यात आले आहे. अनेक देयके संशयित आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी ही मागणी घेत सामाजिक कार्यकर्ते निलेश झाडे यांनी साखळी उपोषनाचा इशारा दिला. तसे निवेदन दिले. या निवेदनाची गंभीर दखल स्वर्ग विकास अधिकारी गोंडपिपरी यांनी घेतली आहे.चौकशिसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांनी केली आहे.


0 टिप्पण्या