त्यांनी अमेरिकेतून पेंटर बोलाविले, 90 हजाराचा खर्च तीन लाखावर


 धाबा ग्रामपंचायत यांनी तीन अंगणवाडीमध्ये ' बाला पेंटिंग ' केली.ही पेंटिंग करणारे भंगाराम तळोधी परिसरातील होते. त्यांनी तीन अंगणवाडीचे 90 हजार रुपये घेतले.मात्र देयक तीन लाखाचा वरती काढण्यात आले आहेत.



 संतनगरी अशी ओडख असलेल्या धाबा ग्रामपंचायतेत 80 लाखाचा कथित भ्रष्टाचाराची चर्चा रंगली आहे. 15 वित्त आयोगातील निधीचा नियमाना डावलून वापर केला गेला आहे. सन 2025 मध्ये लाखो रुपयाचा वस्तू घेतल्या गेल्यात.तसे देयक आहेत. प्रत्यक्षात या वस्तू सन 2026 ग्रामपंचायतेने लोकांपुढे ठेवल्या. वर्षभर या वस्तू कुठे होत्या? एक लाखात होणाऱ्या कामाचे देयक तीन लाखाचावर काढण्यात आले आहे. अनेक देयके संशयित आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी ही मागणी घेत सामाजिक कार्यकर्ते निलेश झाडे यांनी साखळी उपोषनाचा इशारा दिला. तसे निवेदन दिले. या निवेदनाची गंभीर दखल स्वर्ग विकास अधिकारी गोंडपिपरी यांनी घेतली आहे.चौकशिसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या