वरवर एक राजकीय पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्याची तंगडी हातात घेऊन हुतुतू करीत असल्याचे चित्र दिसत असले तरी व्यवसायात यांची मांडी एकमेकांना भिडलेली आहे. संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात काहीसे तसे चित्र आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष्यातील कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातील कार्यकर्ते रात्रभर एकत्र जागून रेती उपसत आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले, का झाले हे सांगायला नको. मात्र पक्ष्याचा नावाने माणसामाणसाला लढविणारे हे गावनेते व्यवसायासाठी एकत्र येतात, यांचा हा खरा चेहरा आहे. एरवी चिखलातील ' कमळा ' वर आपल्या कुजलेल्या ' हाताने ' दगडफेक करणारे हे कार्यकर्ते एका ताटात हसत हसत घास भरवीतात.हे चित्र चीड आणणारे आहे.सामान्य जनतेला विनंती आहे, जागरूक व्हा, राजकारणासाठी भांडू नका.


0 टिप्पण्या