' दादा ' काय हे? पंधरावा वित्त आयोग निधीचा अपहार झाल्याचा खराळपेठ ग्रामपंचायतीवर आरोप




' दादा ' माहितीच्या अधिकार कुणी टाकला तर माहिती मिळत नाही. मिळालीच तर अर्धवट.तुम्ही ' जावई ' आहात आम्हचे. तुम्हच्या सासूरवाडीत ( गोंडपिपरी तालुका ) काय चाललं हे. हे कसले अधिकारी? कितीही पोटात टाकलं तरी यांचं पोट भरतचं नाही. अख्ख्या तालुका पोटात घालतील हे.  संतनगरीतील सर्वाधिक ' काला ' यांनीच दाबला. आता खराळपेठ ग्रामपंचायतीचा विषय पुढे आला आहे.पंधराव्या वित्त आयोगातील ' वित्त ' स्वतःचा खिश्यात घातल्याचा आरोप आहे. अश्या माध्यमातून बातम्या आल्या आहेत. दादा तुम्ही ' देव ', देवाचा दरबारात राक्षस कश्यासाठी ? ' सफाई ' कार्यक्रम तुम्ही राबवावे अशी विनंती आणि मागणी होत आहे.


काय आहे प्रकरण 


गोंडपिपरी तालुक्यातील खराळपेठ येथे पंधरावा वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते मानपल्लीवार यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा अपव्यय केल्याचा आरोप केला आहे.माहितीनुसार, अंगणवाडीसाठी मुला-मुलींसाठी शर्ट-पॅन्ट, गॅस शेगडी, प्रत्येक घरी वॉटर कॅन व कचरा कुंडी, वाचनालयासाठी टेबल-कुर्च्या, प्रशासकीय टेबल-कुर्च्या, सॅनिटरी पॅड तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी चार संगणक देण्यात आल्याचे कागदावर दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात यापैकी कोणतीही वस्तू देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.जिल्हा परिषद शाळेच्या रंगरोटीचे कामही शिक्षकांनी स्वतःच्या पैशातून केल्याचे सांगण्यात आले आहे.  तीन शिक्षकांनी प्रत्येकी सुमारे सात हजार रुपये खर्च करून एकूण २१ हजार रुपये काढून शाळेची रंगरोटी केली. मात्र याच कामाचा फायदा घेत ग्रामसेवक व सरपंच यांनी शाळेची रंगरोटी झाल्याचे दाखवून निधीची उचल केल्याचा आरोप आहे.

पंधरावा वित्त आयोगातून दरवर्षी  सरकारकडून गावासाठी निधी येतो. मात्र या निधीचा दुरुपयोग होत असल्याचे दिसून येत आहे.दुकानातून कोटेशन व बिले घेऊन वस्तू खरेदी केल्याचे दाखवले जाते, परंतु प्रत्यक्षात साहित्य न घेता खोटे बिले अपलोड करून निधीची उचल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असून १० फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यकाळ संपत असताना ७ फेब्रुवारी रोजी पंधरावा वित्त आयोगातून कोणतेही साहित्य न घेता पैशांची उचल करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मानपल्लीवार यांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या