बंडू धोतरे यांचा अन्नत्याग सत्याग्रह सातव्या दिवशी “काळे फासून आंदोलन”



काल रात्री बंडू धोतरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज,बंडू धोतरे यांचे अन्नत्याग सत्याग्रह आता उपोषण मंडपातुन 

चंद्रपूर

 जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या 'लोहारडोंगरी' खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज सातव्या दिवशी प्रवेश केला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलनस्थळी “काळे फासून आंदोलन” केले.


यात संतोष कुचनकर, धर्मेंद्र लुणावत, योगेश दुधपचारे, आकाश घोडमारे, अब्दुल जावेद, अमित कुमरे, प्रमोद मलिक, विनोद थेरे, बंडू दुधे, बिमल शहा, राजू काहीलकर, राजू हाडगे, सचिन धोतरे, चित्राक्ष धोतरे, अजय नेताम, गौरव कुशमवार, किशोर जामदार सहभागी होते. 


समर्थन संस्था

स्थानकवासी जैन समाज, गोंडवाना गणतंत्र पार्टी, जे सी आय चंद्रपूर, अखिल भारतीय जनवादी महिला संघटन, हबिटेट कन्सर्वेशन सोसायटी, जेष्ठ नागरिक संघ, डॉ बाबासाहेब आंबेडकर नेशनल असो ऑफ इंजीनियरस चंद्रपूर, राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र, गुरुकुल शिक्षा संस्था 


माजी खासदार नरेश पुगलिया यांची उपोषण मांडपास भेट.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या