धाबा ग्रामपंचायते अंतर्गत येणाऱ्या घरांची एकूण संख्या एक हजाराचावर आहेत.जे पाणिकर भरतात त्यांना ग्रामपंचायतेने पाण्याच्या कॅन वाटप केल्या आहेत. अद्याप काही कुटुंबाना कॅन मिळालेल्या नाहीत, अशी माहिती आहे.8/2/2025 ला 699340 ( सहा लाख 99 हजार 350 रुपये ) कॅन खरेदी साठी काढण्यात आले.व्यक्तिगत कुटुंबाकरिता या कॅन खरेदी केल्या गेल्या आहेत. या कॅनचा दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत. फारफार 300 रुपये प्रति कॅनची किंमत असल्याचे जानकाराचे मत आहे. त्यानुसार 1000 कॅनची किमंत तीन लाख रुपये होते.मग प्रश्न असा उपस्थित होतो उर्वरित चार लाख रुपये गेले कुठे? हजार पेक्षा अधिक कॅन खरेदी केली असेल असे आपण गृहीत धरले तरी फारफार पन्नास हजार रुपये वाढतील. उर्वरित रक्कमेचा विषयाचे काय ? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.


0 टिप्पण्या