धाबा ग्रामपंचायतेने चिमुकल्या मुलांनाही सोडले नाही.त्यांचा निरागसतेचा उपयोग पैसे कामाविण्यात केला आहे.अंगणवाडीतील मुलांना पाण्याची बाटल देण्यात आली. या बाटलांचा खर्च तब्बल एक लाख वीस हजार आहे. वजा, बेरीज, गुणाकार, भागाकार केला तरी हा खर्च कुठेच ' टाळेबंद ' होताना दिसत नाही.
धाबा ग्रामपंचायतेचा अंतर्गत सात अंगणवाडी आहेत. यात साधारणता दोनसे मुलं, मुली आहेत.ग्रामपंचायतेने या मुलांना पाण्याचा बाटल्या दिल्या. तीन ते सहा वर्षाचा मुले याचे लाभार्थी होते. ज्या मुलांची उपस्थिती होती त्यांनाच बाटलांचा लाभ मिळाला. फारफार 100 मुलांना लाभ मिळाल्याची माहिती आहे. मात्र ग्रामपंचायतेने याचे देयक काढले एक लाख वीस हजाराचे. पहिला देयक 21/03/2025 ला काढला गेला. 60000 हजाराचा. दुसरा देयक 28/03/2025 ला काढण्यात आला. रक्कम होती 60000 हजार. हे कुठलं अर्थशास्त्र आहे. याला विकास म्हणायचं काय? हे तुम्ही ठरवा.



0 टिप्पण्या