लोहारडोंगरी खाण विरोध आणि जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या मागण्या
चंद्रपूर: जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या 'लोहारडोंगरी' खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज तिसऱ्या दिवशी प्रवेश केला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलनस्थळी 'लोटांगण आंदोलन' करण्यात आले.
लोटांगण आंदोलन मधे सहभागी किशोर जामदार, योगेश दुधपचारे, अविनाश पोइनकर, बंडू दुधे, धर्मेंद्र लुणावत, नितीन रामटेके, राम कोंड्रा, सुधीर देव, प्रमोद मलिक, महेंद्र शेरकी, अब्दुल जावेद, गौरव कुषमवार, कुणाल देवगीरकर, बिमल शहा, विजय हेडाऊ, सचिन धोतरे, राजू काहिलकर, विनोद दुधनकर, राजू हाडगे आदी सहभागी झाले होते.
लोहारडोंगरी खाण प्रकल्पाविरोधात, ऑनलाईन याचिकेला २५,००० स्वाक्षऱ्या पूर्ण
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-कऱ्हांडला तसेच नवेगाव-नागझिरा या अतिशय संवेदनशील व्याघ्र भ्रमणमार्गातील प्रस्तावित ‘लोहारडोंगरी’ लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या 'सेव्ह लोहारडोंगरी, सेव्ह ताडोबा' या ऑनलाईन मोहिमेला अभूतपूर्व यश मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत या याचिकेने २५,००० स्वाक्षऱ्यांचा आकडा पार केला असून, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आता जनचळवळ अधिक तीव्र झाली आहे.
आज मंडपास भेट देऊन समर्थन/पाठिंबा देणारे संस्था व व्यक्ती
बहार नेचर फाऊंडेशन, वर्धा, शिव छत्रपती प्रचारक मंडळ, चंद्रपूर, आझाद गार्डन गुड मॉर्निंग ग्रुप, चंद्रपूर, सायकल डीलर्स असो., चंद्रपूर आज मंडपास भेट देणारे राजू जोशी, सचिन साळवे, सचिन निंबाळकर, प्रो. सुभाष गिरडे, डॉ हर्षल मटाले, डॉ. नचिकेत कोल्हे, डॉ यशवर्धन वाडेकर, डॉ गायत्री वाडेकर, डॉ बाबाजी घेवडे, वर्धा, राजदीप राठोड, भद्रावती किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर, नरेंद्र बोबडे, नितेश येगेवार, महेंद्र डोये, अब्दुल एजाज, विनोद रेगुंडवार, उदय धोबे, राहुल कुचनकर, संतोष दोरखंडे, बंडू काकडे, राजेश पिंजरकर, अरुण भेलके, प्रफुल बोधने आदींनी भेट दिली.


0 टिप्पण्या