खरंतर गाव मंदिर असतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एका भजनात म्हटलं,' तुझं गावचं नाही का तीर्थ '.गाव तीर्थ असते, प्रत्येक गावकऱ्याचा श्वास असते. गाव माय, गाव बाप असते. बालपणापासून ते सरणावर जात पर्यंत या गावातील धूळ आपल्या अंगावर असते. त्याच गावाची प्रतिमा कुणी मलीन करीत असेल तर सर्वांनी एकजूटीने त्याचा विरोधात सामूहिक आवाज उठवायला हवे.दुदैवाने तसे झाले नाही. बागेतील फुले करपली म्हणून त्यांच्यासाठी घरात बसून अश्रू ढाळने शोकांतिका आहे. तेव्हा जेव्हा जंगलात वनवे पेटले आहे.
आपल्या गावासाठी रस्त्यावर उतरणारे गावे मी बघितली आहेत. धाबा गाव मात्र याला अपवाद ठरले आहे. येथील काही गावनेते दुसऱ्या गावातील नेत्यांचे एकूण पुढे यायला घाबरतात.? अशी चर्चा आता रंगली आहे.जेव्हा त्याच नेत्यांनी स्वतःचा गावावरन होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलने केली आहेत. आणि त्यांनी दाखवून दिले आमच्यासाठी गाव तीर्थ आहे.ग्रामपंचायत धाबाच्या आर्थिक अपहाराची चर्चा विरोधक करीत होते मात्र जाहिरित्या ते ॲक्शन मोडवर आले नव्हते. खरंतर त्यांच्यासाठी ही फार मोठी संधी होती. उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला मात्र उपोषण स्थळाला त्यांनी भेट दिलं नाही. का? विरोधकांची ही भूमिका भ्रमित आणि चिंताजंनक आहे. कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील खंबीर आवाज विरोधक असतात.हा आवाज का थरथरतोय हे कळायला मार्ग नाही.
निलेश झाडे


0 टिप्पण्या