खरंतर काँग्रेसची लोकसभेत सत्ता नाही, काही मोजक्या राज्यात आहे.सध्या काँग्रेसचा एकमेव चेहरा राहुल गांधी आहेत.राहुल गांधी सामान्य माणसा मिसळतात, त्यांचा समस्या ऐकून त्या सोडविण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. आतातर केवळ काँग्रेस नाही देश्यातील जनता त्यांचा पाठीशी उभी होताना दिसत आहे. चंद्रपूरात मात्र भलतच सुरु. तोंडाजवळ आलेला घास केवळ आपल्या अहंकाराने काँग्रेस नेत्यांनी गमविला.याच्या मोठेपणाचा लढाईत पक्ष तुकड्या, तुकड्यात विखूरला जात आहे. कार्यकर्त्तांची संख्या कमी, नेत्यांची भरणा अधिक काहीसं असं चित्र जिल्हात दिसू लागलं आहे. ' विजय ' मिळावा यासाठी काही नेते उगीच डरकाळी फोडत आहेत. काही आपली थोटी ' प्रतिभा ' उंचविण्यासाठी प्रशस्त असलेल्या पक्षाला खीळंखीळं करीत आहेत.
गोंडपिपरी तालुका काँग्रेसने गोंडपिपरी शहरात गॅस दरवाढी आणि निर्माण झालेल्या तुटवड्या विरोधात आंदोलन केले. हे आंदोलन गोंडपिपरी शहरातील महात्मा गांधीजी यांच्या पुतड्या पुढे झाले. या आंदोलनात मोजून दहा ते पंधरा लोकं होती. जे होते ते काँग्रेसचे नेते पदाधिकारी होते. फारच महत्वाचा प्रश्नाला काँग्रेसने हात लावला असला तरी सामान्य माणसाने पाठ फिरविली. का? एकतर तुमच्यावर जनतेचा विश्वास उरलेला नाही किवा नियोजनाचा अभाव होता. कधी काँग्रेस पक्षाशी युती करायला लहान पक्ष विनंती करीत होते, आज तेच पक्ष स्वतःचा अटी, शर्ती ठेवून युती करताना दिसत आहे. गोंडपिपरी काँग्रेस पक्षाची अवस्था अशी की सर्व अटी शर्ती मान्य करायला ते तयार आहेत. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतेच्या निवडणुका होत आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रामीणस्तरावरील चेहऱ्यांचा अभ्यास करून निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. नाहीतर पराभव होण्याची शक्यता अधिक आहे.पक्ष्याने तुम्हाला मोठे केले आता पक्षाला तुम्हची नितांत गरज आहे. डोक्यात अहंकार शिरलेल्या या गावनेत्यांना सांगणार कोण?
निलेश झाडे


0 टिप्पण्या