राज्यातील धक्कादायक प्रकार : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्यार्थी पीत आहेत दूषित पाणी : वर्षभरापूर्वी खरेदी केलेले वॉटर कुलर केवळ कागदावर

 


 ग्रामपंचायतेने जिल्हा परीषद शाळा धाबा येथे 85 हजाराचा वॉटर कुलर जानेवारी 2025 दिला होता. प्रत्यक्षात हा वॉटर कुलर शाळेत लागलाच नाही.शाळेत शिकणाऱ्या शेकडो मुलांना शाळे जवळ असलेल्या एका खाजगी विहिरीच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे.हा धक्कादायक प्रकार जिल्हातील पहिली मुलींची शाळा असलेल्या शाळेत घडला आहे.


100 वर्ष पूर्ण केलेल्या ब्रिटिश कालीन जिल्हा परिषदेचा शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सन 2018 मध्ये शाळेत वॉटर कुलर आलेच नसल्याची माहिती मुख्यधापिका जया कंचर्लावार यांनी दिली.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक येलमुले यांनी दूषित पाणी पिल्याने आरोग्याचा धोका वाढला असल्याचे सांगितले.हा वॉटर कुलर केवळ कागदावरच असल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे.माहितीचा अधिकार टाकणारे प्रवीण मेश्राम यांनी निपक्ष चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे.सद्या स्तिथीत शाळेपासून जवळच असलेल्या एका खाजगी विहिरीच्या पाण्यातून मुले तहान भागवीत आहेत. विशेष म्हणजे पंधरा दिवसापूर्वी नळातील पाण्यात जंतू आढळले होते. पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकाना जाब विचारला होता.



Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या