ग्रामपंचायतेत झालेल्या आर्थिक अपहाराची चौकशी सुरु झालेली आहे. हा आर्थिक अपहार ज्या काळात झाला त्यावेळी सक्रिय असलेल्या अधिकाऱ्याची बदली झाली आहे. मात्र चार दिवसापूर्वी झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात हा अधिकारी दिसला.हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पार पडला होता. भाजप कार्यकर्त्यासोबत हा अधिकारी कसा? असे प्रश्न आता विचारले जात आहे.' दादा ' काय चाललं हे? संतनगरीची पवित्र प्रतिमेला डाग ज्यांनी लावला, त्यांचा सोबत तुम्हचे कार्यकर्ते आहेत ? काय मेसेज घ्यायचा यातून ? भाजप कार्यकर्त्यासोबत फोटो वायरलं झाला आणि चर्चा रंगू लागली आहे. खरा प्रश्न असा तुम्ही कुणाचा पाठीशी, याची चर्चा आता तालुक्यात सुरु झाली आहे.
ग्रामपंचायतेने वर्षभर केलेल्या कामाचा जमा खर्चाची नोंद नसल्याची माहिती आहे. माहितीच्या अधिकारात मागविलेली संपूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही.माहिती मिळणार तरी कशी? काही नोंदच नसल्याचे बोलले जात आहे.


0 टिप्पण्या