धाबा ग्रामपंचायतेने सन 2025 मध्ये नालीतील उपासा करणे, फेकणे आणि काढने यासाठी 445313 ( चार लाख पंचेचाळीस हजार तीनशे तेरा ) रुपयाचा खर्च केला आहे. ही रक्कम तीन हेडमधून काढण्यात आली. नालीतील उपसा केलेला मलमा ट्रॅक्टरने फेकण्यासाठी 169500 ( एक लाख 69 हजार पाचशे रुपये ) खर्च झालेत. मलमा उपसण्यासाठी 243313 (दोन लाख 43 हजार तीनशे तेरा रुपये ) तर मलमा काढण्यासाठी 32500 ( 32 हजार पाचशे रुपये ) खर्च करण्यात आले. दिनांक 39/07/2025 ला आठ देयक काढण्यात आले. दिनांक 31/07/2025 ला चार तर दिनांक 5/05/2025 ला एक देयक काढल्या गेले. लाखो रुपये खर्च केल्या गेल्या नंतरही नाली स्वछ का झाल्या नाहीत हा प्रश्न आहे. दिनांक 30/10/2023 खर्च केलेल्या रक्कमातील त्रूट्या ( अमाऊंट ऍडजेस्टमेंट ) नावाने 31/08/2023 ला पाच लाख,30/10/2023 ला पाच लाख रुपये काढण्यात आले आहे.ही तळजोड ( ऍडजेस्टमेंट ) कुठे झाली कळायला मार्ग नाही.


0 टिप्पण्या