धाबा ग्रामपंचायत,पन्नास हजाराची बैग, बूट दोन लाखात


 


धाबा ग्रामपंचायतेने जिल्हा परिषद शाळा धाबा येथील विध्यार्थ्यांना बैग, बूट दिले. या शाळेची पटसंख्या 103 आहे. मार्च 28/03/2025 बैग, बूटची खरेदी करण्यात आली. आज अनेक विध्यार्थ्यांची बैग फाटलेली आहे. बुटाची तिच अवस्था आहे. जेव्हा ठोक विक्रेत्याकडून सामान खरेदी केल्या जाते तेव्हा त्याची किंमत कमी होते. साधारण पाचशे रुपया प्रमाणे खरेदी केल्या गेली तर पन्नास हजार, एक हजार रुपयाने खरेदी केली असेल तर एक लाख. बॅग आणि बुटाचा कमकुवत दर्जा बघता एका विद्यार्थ्यामागे फार फार तीनशे रुपये खर्च केले गेले आहे. जेव्हा की दोन लाखाचे देयक काढण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना बॅग आणि बूट मिळाली सुद्धा नसल्याची माहिती आहे. माहितीच्या अधिकारात अर्धवट माहिती पुरवण्यात आलेली आहे. बूट आणि बॅगेसाठी तीन लाखाचावर देयक काढल्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या