चंद्रपूर
धाबा ग्रामपंचायतेत झालेल्या आर्थिक अपहाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी घेत धाबा गावात साखळी उपोषण करण्यात आले होते.सामाजिक कार्यकर्ते तथा rpi गट ( आठवले) चे तालुका अध्यक्ष पारसनाथ अलोणे, बौद्ध महासभा शाखा धाब्याचे अध्यक्ष केलीचंद झाडे,शेतकरी संघटना युवा आघाडीचे तालुका सचिव सुरज भस्की, सामाजिक कार्यकर्ते निलेश झाडे यांनी उपोषण केले.या उपोषणाची तात्काळ दखल गोंडपिपरी पंचायत समितीचे सवर्ग विकास अधिकारी संजय पुप्पलवार यांनी घेतली.सवर्ग विकास अधिकारी संजय पुप्पलवार,विस्तार अधिकारी रत्न पारखी यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन चौकशीच्या आदेशाची छायांकित प्रत उपोषण कर्त्यांना दिली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणाला शिवसेना ( उबाठा ) चे तालुका अध्यक्ष सुरज माडुरवार, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) चे तालुका अध्यक्ष राजेश कवठे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण सांगडे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे फिरोज खान आणि विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता.सुरज माडूरवार,युवा सेना तालुकाप्रमुख तुकाराम सातपुते युवा सेना शहरप्रमुख विवेक राणा यांनी उपोषण स्थळाला भेट दिली.तालुक्यातील राजकीय पक्षातील महत्वाचा पदावर असलेल्या अनेक नेत्यांनी ( नाव जाहीर न करण्याचा अटीवर) या उपोषणाला साथ दिली.


0 टिप्पण्या