शब्दांचा मलमपट्टीने जखमा बऱ्या होत नाही आणि उतू आलेल्या दुधाचा भांड्यावर झाकण झाकलं तर ते अधिक तीव्रतेने वर येतोय. सर्वाना याचा अनुभव आहेच.शिवसेना ( उबाठा ) च्या नेत्या सुषमा अंधारे या चंद्रपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी म्हटलं,आम्हची वाट अडवीण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आगामी लोकसभा निवडणूकित नाकेबंदी करू, असा इशारा त्यांनी दिला. अंधारे यांनी कुणाचे नाव घेतले नाही मात्र बोट निशाण्यावर होतं.चंद्रपूर महापालिकेमध्ये शिवसेना (उबाठा ) ने भाजपाला पाठिंबा दिला.भाजपाचा महापौर आणि शिवसेना ( उबाठा ) गटाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापती पद मिळाले.इथे शिवसेना चुकली की काँग्रेस हे सांगायची आता गरज उरली नाही. जनतेला सारं काही कळलं आहे.
केवळ उच्च कोटीचा अहंकारामुळे हे सारे घडलं. लोकसभेत मिळालेला विजय एकट्याचा नव्हताच, तो विजय सामूहिक होता. ( घटक पक्ष सोबत होते. त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले.) याचा स्वीकार करायला काँग्रेसचे जेष्ठ नेत्यांनी नकार दिला. विधानसभेच्या निवडणुकीत भ्रमाचा फुगा शेवटी फुटला. काँग्रेसमुक्तीचा नारा देणाऱ्याचा विरोधात सामान्य काँग्रेस कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत. विरोधकांशी भांडत आहेत आणि छातीठोकपणे सांगत आहे, आम्ही संपलो नाहीच आणि संपणार ही नाही... मोठी झेप घेण्याचा तयारीला लागलो आहोत. आणि दुसरीकडे हे नेते स्वतःचा अहंकार त्यागायला तयार नाहीत. जिथे दोन काँग्रेस नेत्यांची भाषा एका सुरात ऐकू येत नव्हती तिथे तिसरा पक्ष का म्हणून तुम्हच्या सोबतच यायला हवा ? ज्यांनी पक्षासाठी आपलं आयुष्य झिजवीलं, त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे कुणाचे कधी लक्ष गेले. निवडूनक आली की बंधू प्रेम जागृत होते. भाऊ आपटला, बोलती बंद. नेते आहात तुम्ही ? अंधारे यांचे काय चुकले. खरंतर त्यांनी आरसा दाखविला. खोट्या अहंकारातून बाहेर निघा.. कुटुंबासाठी नाही, पक्षासाठी लढा. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक बघा, अर्धे कार्यकर्ते तुम्हचे घर सोडून जाण्याचा तयारीला लागले आहेत.
चंद्रपूर महानगर पालिकेचा पराभवाचा चेंडू कधी इकडे, कधी तिकडे फेकला जात आहे. येथील पराभवाचा खरा व्हिलन जनतेने ओडखला आहे. आता हा चेंडू तुम्हा दोघांचा हातून केव्हाचाच सुटला, तो जनतेचा दरबारात पोहचला आहे. तुम्ही जनतेचा विश्वास गमाविलात. येणाऱ्या निवडणूकित पराभव झाला तर त्याचे खापर evm मशीनवर फोडू नका.
निलेश झाडे

0 टिप्पण्या