' त्यांचा ' मार्ग कायदेशीर, करंजी midc




बारा गावातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नवी समितीची स्थापना झालेली आहे. ही समिती शेतकऱ्यात जागृकता निर्माण करेल आणि शेतकऱ्यांचा हितासाठी कायदेशीर लढा देणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेश कवठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही समिती आता जे कार्य करणार आहे, तेच कार्य प्रारंभी गठीत झालेल्या समितीच्या नावावर सुद्धा केले जावू शकत होते. नाव बदलले जरी असले तरी कार्य शेतकऱ्यांचे हित हेच आहे, असा विश्वास पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या मान्यवरानी दिला. समिती बारा गावात जनजागृती करेल आणि बोरगाव येथे ' पहिली शेतकरी परिषद ' घेणार आहे. या परिषदेत काही मोठे चेहरे मार्गदर्शनासाठी येणार आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर,ऍड. दीपक चटप,अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड अरुण लाटकर उपस्थित असणार आहेत.


तुम्ही लढा, आम्ही कागद सांभाळतो..


सरकार आणि प्रशासनावर दवाब टाकण्यासाठी आंदोलन हे मोठे शस्त्र आहे. सुरवातीला गठीत झालेल्या समितीने 23 एप्रिलला तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली ताकद दाखविली.शेतकऱ्यातील रोष यातून पुढे आला. या समितीच्या कार्यावर बोट न ठेवता दुसऱ्या समितीने कायदेशीर लढा लढण्याचा संकल्प केला आहे.


चर्चा अशीही...


तालुक्यात कुठलीही नवी समिती निर्माण झाली कि त्यात आपले नाव कसे समाविष्ट होईल, ही असुरी इच्छा असलेल्या काही व्यक्तींची फारच धडपड असते. मग ती समिती सामाजिक असो, राजकीय, पत्रकार क्षेत्रातील का असेना. स्वतःचे नाव समितीत समाविष्ट करून आपणच तेवढे सर्वगुण संपन्न आहोत, हे दाखविण्याचे ते प्रयत्न करीत असतात. आता येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काहींचा ' अट्टाहास ' असल्याची चर्चा सुरु आहे.


निलेश झाडे 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या