प्रबोधनातून ' बोध ' होईना : थेट मंदिरात फ्री स्टाईल




धाबा 


खरंतर मंदिर शांततेचे प्रतीक असते.असे असताना संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान याला अपवाद ठरले की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. येथील शांतता पुरती भंगल्याचा प्रत्यय धाबा गावातील जनतेला आला.प्रबोधनाचा कार्यक्रमातच वाद निर्माण झाला. हा वाद मारहाणी पर्यंत गेला.या घटनेने मंदिराची पवित्रता धोक्यात आल्याची चिंता भाविक व्यक्त करीत आहेत.


विदर्भ, तेलंगणा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेत ' ऑल इज वेल ' नसल्याचे चित्र आहे. दोन परस्पर विरोधी मतप्रवाह येथे सध्या दिसत आहे. हा मत प्रवाह बांधकामावरून अधिक तीव्र झालेला आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानास सभागृह बांधकामासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेतून २० लाखांचा निधी मंजूर केला .निधी मंजूर होऊन दोन महिने झाले मात्र सभागृहाची जागा निश्चित झाली नव्हती. संस्थेच्या विश्वस्तांमध्ये  जागेबाबत एकमत नसल्याची चर्चा होती. शेवटी मंगळवाराला सभागृहाचे भूमिपूजन झाले आणि वादाला सुरवात झाली. मंदिर परिसरात सभागृहाचे बांधकाम नको, असा हट्ट काहींनी धरला होता. दुसरीकडे बांधकाम मंदिर परिसरातच करू असे अनेक विश्वस्तानी ठरविले. मंगळवारला विधिवत भूमिपूजन झाले.सदर बांधकाम यात्रा भरणाऱ्या जागेत होत असल्याने जागेची अडचण होईल अश्या आशयाचे दुसऱ्या दिवशी बांधकाम बंद करावे यासाठी काही गावकर्यांनी निवेदन दिले.निवेदन आल्यामुळे संस्थेचे कोषाध्यक्ष यांनी काम बंद करण्याचा सूचना दिल्या आणि संस्थेच्या कार्यालयात येऊन बसले. या दरम्यान एका व्यक्तीने कार्यालयात जाऊन धक्काबुक्की केली, असा त्यांचा आरोप आहे. ही घटना ताजी असताना शनिवारला ( दिनांक 23 मे ) श्री कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेचा सभागृहात प्रबोधनाचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमा दरम्यान वाद झाला. वाद थेट मारहाणी पर्यंत पोहचला.या कार्यक्रमाला अनेक विश्वस्तानी दांडी मारली होती.या घटनेची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.



 वादाची परंपरा...


संस्थेत कथित अपहार झाल्याची चर्चा होती. त्यानंतर वादाला खरी सुरवात झाली. या वादाला कंटाळून काहींनी राजीनामा दिला होता मात्र त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला होता.संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला तीर्थस्थळाचा ' ब ' दर्जा मिळाला आहे.एकीकडे भाविकात आनंद साजरा होत असताना संस्थेतील वाद चव्हाट्यावर आल्याने भाविकात नाराजी व्यक्त केली जात आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या