गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत धाबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंगळपेठ येथील मामा तलावतील गाळ उपासण्यात आले. उपसण्यात आलेला गाळ अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा शेतासाठी दिला जायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. शेतीचा नावावर जमीन सुपीक बनविणारा हा गाळ व्यवसायासाठी वापरला गेला आहे. याची तक्रार करण्यात आली असून चौकशीला सुरवात झालेली आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील अनेक तलावातील गाळ उपासा सुरु आहे. हा गाळ पडीत असलेल्या जमिनीसाठी फारच उपयुक्त ठरत असतो. त्यामुळे शासन हा गाळ शेतात वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा देत असते.बहूभूधारक शेतकरी हा गाळ स्वखर्चाने वाहून नेण्याची तरतूद सुद्धा आहे. हा गाळ केवळ शेतात वाहून नेला जावू शकतो. इत्तर कुठल्याही कामात या गाळाचा वापर करता येऊ शकत नाही, तसे आढळून आले तर शासन कार्यवाही करीत असते . असे असताना गोंडपिपरी तालुक्यात हा गाळ व्यवसायासाठी वापरला जात असल्याची माहिती आहे.अमृतगुळा येथील तलावतील येथील तलावातील गाळ विकला गेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याबाबत तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. शासनाने गाळयुक्त शिवार ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना पुढे आणली मात्र चंद्रपूर जिल्हातील प्रशासनाने त्या योजनेलाच सुरुंग लावले.शेतकऱ्यांचा ' गाळ ' खाणाऱ्या कर्मचाऱ्यावर काय कार्यवाही होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या