' हा ' सुगंध नकोसा ! तंबाखू ठरत आहे जीवघेणा

 



खरंतर गुटखा खाणाऱ्यांची संख्या फारच वाढली आहे. त्यात विध्यार्थी, महिलांचे वाढलेले प्रमाण चिंताजनक आहे. असे असले तरी या व्यवसायात मिळणारा मोठा नफा बघता, आपल्या प्रतिष्ठेवर मूठमाती टाकीत अनेकजण या व्यवसायात सक्रिय झाले आहेत. ज्या किराणा दुकानातून घरात लागणाऱ्या जीवन उपयोगी वस्तू घेतल्या जातात, त्याच दुकानात बंदी असलेल्या तंबाखूची दुर्गंधी पसरत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील सीमावर्ती भागात हा व्यवसाय अधिकच फोफावला आहे. किराणा वस्तूच्या विक्रीचे सोंग घेऊन चारचाकी वाहनातून बंदी असलेल्या तंबाखूची तस्करी सुरु असल्याची चर्चा आहे.


गावागावातील लहान - मोठ्या किराणा दुकानदारांना चारचाकी वाहनातून किराणा वस्तू पुरविल्या जातात.असे अनेक वाहने धाबा परिसरात फिरत असतात. याच वाहनातून बंदी असलेला तंबाखू पुरविल्या जात असल्याची माहिती आहे. या वाहनात वरवर किराणा सामान दिसत असले तरी त्याच वाहनातून लाखोच्या तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती आहे. यात काही राजकीय पक्ष्यातील व्यक्तींचे नाव पुढे येत आहे. धक्कादायक बाब ही की काही माध्यमसमूहातील व्यक्ती सुद्धा तस्करीत गुंतले असल्याची चर्चा आहे. या प्रकारकाडे संबंधित  विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या