खरंतर संतनगरी अशी धाबा गावाची ओडख. केवळ विदर्भ नाही तर तेलंगणा येथील लाखो भाविक संतनगरीपुढे नतमस्तक होतात. मात्र येथे विकासाचा नावाने पुरते कोरड पडले आहे. प्रवाशांसाठी विश्रांतीसाठी येथे साधे बसस्थानक नाही.ही समस्या लक्षात घेता युवानेते तथा ग्रामपंचायत सदस्य नितेश झाडे यांनी बसस्थानक निर्मितीची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तेलंगणा सीमेवर असलेला गोंडपिपरी तालुक्यातील धाबा हे सर्वात मोठे व महत्वपूर्ण गाव आहे. गोंडपिपरी वरून तेलंगनाचे अंतर फार कमी आहे. यामुळे अनेक प्रवासी गोंडपिपरी वरून धाबा पोडसा हा मार्ग गाठीत तेलंगणात जातात.धाबा हेच परिसरातील महत्वाचे व मोठे गाव आहे. साधारणत तीस गावांचा थेट संपर्क धाबा गावाशी येतो. या मार्गावर
तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. धाबा व अनेक गावातील प्रवाशी तेलंगणा व गोंडपिपरी येथे विविध कामासाठी येतात. वाहतुकीची मोठी दळनवळण असताना धाबा येथे बसस्थानक नसल्याने प्रवाश्याची मोठी गैरसोय होत आहे. अनेक वर्षांपूर्वी धाबा पोलीस स्टेशन समोर बसस्थानक होते. ते जीर्ण झाले. तेव्हापासून अजूनही अध्यापही नवीन बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली नाही. परिणामी प्रवास करणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हि महत्वाची समस्या लक्षात घेता तातडीने धाबा येथे बसस्थानकाची निर्मिती करावी अशी मागणी धाबा येथील युवा नेते नितेश झाडे यांनी केली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे झाडे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या