घरकुलाची रेती, ' या ' नेत्यांनी खाल्ली




खरंतर नेते गाव विकासासाठी झटायला हवे. गोंडपिपरी तालुक्यात उलटचं चित्र आहे. येथे स्वतःचा विकास कोणत्याही मार्गाने करून घेण्याची जणू स्पर्धा सुरु असल्याचे चित्र आहे.घरकुल लाभार्थ्यांचा नावावर करोडोच्या रेतीची उचल हिवरा घाटातून केल्या गेली आहे. उपसलेल्या घाटातील रेती आणि घरकुलसाठी वापरण्यात आलेल्या रेतीचे गणित न जुळणारे आहे. विशेष म्हणजे रेतीची वाहतूक करणारे 99 टक्के गावपुढारी आहेत. आता हेच पुढारी गावाची धुरा सांभाळण्यासाठी आटापीटा करताना दिसत आहेत. शासनाचा महसूलावर डल्ला मारणारे हे नेते गावाचा विकास खरंच करू शकणार काय? याची चर्चा आता रंगली आहे.


घरकुल बांधकामासाठी शासनाने काही रेती घाट राखीव ठेवले आहेत. अश्या घाटातून घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास रेती दिल्या जाते. यासाठी केवळ रेती वाहतूकसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाचा तेवढा खर्च घरकुल लाभार्थ्याला द्यावा लागतो, तसा नियम आहे. घडत मात्र वेगळेचं आहे.घरकुल बांधकामासाठी शासनाने राखीव ठेवलेल्या रेती घाटातुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपासा सुरु असल्याची चर्चा आहे. हा घाट हिवरा घाट या नावाने ओडखला जातो. ही एक प्रकारची तस्करी झाली. यात केवळ राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते गुंतले आहेत, असे बोलले जाते.खरंतर या घाटातील रेती घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य दिली जाते, केवळ वाहतूकीचा खर्च लागतो. मात्र घरकुल लाभार्थ्यांकडून एका ट्रॅक्टर ट्रिपचे 2000 ते 3000 घेतल्या जात असल्याची माहिती आहे. घरकुल वगळता इत्तर कामासाठी या घाटातील रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.शासनाचाच महसुलावर डल्ला मारणारे हे नेते खुर्चीवर बसण्याचे स्वप्न रंगवीत आहेत. अश्या तस्करावर कुठलीच कार्यवाही होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

देव पावला, पाऊस आला 


या नेत्यांनी हिवरा नाला मोठ्या प्रमाणात उपसला आहे. नाल्यात मोठं मोठे खड्डे खोदून रेती काढल्या गेली. योगायोगाने पाऊस आला आणि काही खड्ड्यात वाहून आलेली रेती जमा झाली आहे. मात्र असे अनेक खड्डे अजुनीही या नेत्यांच्या चोरीची कथा सांगत आहेत.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या