विशेष सभेला पोलीस स्वरक्षण! कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेत नेमकं काय घडलं?




दोन राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेची विशेष सभा चर्चेचा विषय ठरली आहे. या सभेसाठी संस्थांनने चक्क पोलीस सुरक्षा मागवीली होती . या आधी असं कधीच घडलं नव्हतं. या विशेष सभेत संस्थांचे कोषाध्यक्ष सांगडे यांना पदावरून आणि विश्वस्त पदावरून काढण्यात आले आहे, तशी माहिती संस्थेने दिली आहे . सभेचे विषय वाद होण्यासारखे नव्हते तरीही पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.


श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थांन धार्मिक संस्थान आहे काय? असा प्रश्न निर्माण व्हावा इतके वाद या संस्थेतून पुढे आले. कधी नव्हे ते सभागृह आणि मंदिर परिसरात  मारहाण झाली होती. येथील पदाधिकारी आणि विश्वस्तांचा वादाची चर्चा दहिदिशा व्यापून टाकली होती. येथे झालेला कथित अपहार थेट धर्मदाय आयुक्त कार्यालयात पोहचला आहे. ही संस्था वादाचा आखाडा बनली आहे.हे कुणामुळे आणि का घडले, याची चर्चा सुरु आहे.


सभागृहाचे बांधकाम ठरले ठिणगी 


 सभागृहाचा बांधकामासाठी निवडलेल्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाला. हा वाद हातात काठी घेण्यापर्यंत पोहचला. काही विश्वस्त ( सांगडे वगळता इत्तर ) मंदिर परिसरातील ( यात्रा भरते ती जागा ) जागेवर बांधकाम करण्यासाठी आग्रही होते. तर सांगडे यांनी विरोध दर्शवीला होता. हा वाद टोकावर पोहचला. मारहाण आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यापर्यंत गेला. दोन्ही गट आम्ही चुकलोच नाही, अशी ओरड आता करीत असले तरी या वादाने मंदिराचे पावित्र्य पूर्णपणे धुळीस मिळविले अशी चर्चा आहे.


ज्याचा अंगी लहानपणा तोची देव..


खरंतर धार्मिकपणाचे मोजमाप करण्याची कुठलीच पद्धत अस्तित्वात नाही.ज्याचा अंगी लहानपणा तोची देव, असं म्हटलं जाते. या संस्थेतील पदाधिकारी लहानपण घेण्यास कुणी तयार नव्हते, तसं बोलले जात आहे. मोठेपणाचा अहंकाराने या मंदिराबद्दल असलेल्या पवित्र श्रद्धेची चादर मळकट करून ठेवल्या गेली. याला नेमका कोण दोषी? हे येत्या काळात पुढे येणार आहेच.


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या