संतनगरीत दोन ' झुंड '! दोघांनी मिळून माती केली




धार्मिक विषय हाताळताना गर्दी कशाला हवी ? या गर्दीला हिंदी मध्ये ' झुंड ' म्हणतात. याला स्वतःचा चेहरा नसतो, विचार नसतो, तरी ही हा झुंड फारच प्रभावी ठरत असतो. असे दोन झुंड सद्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थांमध्ये बघायला मिळत आहेत. दोन्ही झुंडकडे आपापल्या परीने शक्ती आहे. हे खरे असले तरी या दोघांनी संतनगरीची माती करून टाकली आहे.


धाबा गावातच नव्हे देश्यातील अनेक मंदिरातील जे किळसवाने प्रकार पुढे आले होते, त्याची चर्चा समाजमाध्यमात बरीच रंगली होती. अनेक स्वयंभू संत, आध्यात्मिक गुरु, प्रवचनकार  सद्या कारागृहात बंदिस्त आहेत.तरीही लाखो जनता त्यांचे चरणस्पर्श करायची आणि करीत आहेत.आताही अश्या अनेक तथाकथित दिव्यपुरुषांचे फोटो अनेकांचा घरी दिसतात.


 कपाळावर टिळा लावून बोलबच्चन केले की भाविकांची रांग लागते. आणि केवळ आशीर्वाद दिल्याने प्रश्न सुटतात , असा अनुभव आल्याने अनेकांनी कपाळावर टिळा लावला आहे. दुसरीकडे अश्या श्रद्धास्थानात राजकीय हस्तक्षेप वाढला आणि अनेक श्रद्धास्थानाच्या संस्थेत राजकीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांची भरणा झाली. राजकारण आले की राजकारण होणारच. संतनगरीत तेच झाले.


काहीना ग्रामपंचायतच्या खुर्चीवर बसण्याची घाई झाली. तर काहीनी पंचायत समिती,जिल्हा परिषद येथे जाण्यासाठी कंबर कसली. यासाठी धार्मिक प्लॅटफॉर्म  फारच महत्वाचे आहे हे लक्षात येताच, त्यांनी श्रद्धास्थानात सक्रियत्ता वाढविली. मी मोठा हे सिद्ध करण्याचा असुरी स्पर्धेत संतनगरीची मात्र माती झाली. या मातीतून भविष्यात फिनिक्स पक्षी मोठी झेप घेईल अशी प्रार्थना करू या...!

असे गुरुजी नको...! 

ठाम भूमिका घेण्याचे बळ नसताना आणि कुठलेच पद नसताना पुढे पुढे होण्याची गरज काय? राजूर्यातील नेत्याला घरी हागायला बोलाविणारे गावाचे विकास काय करतील? पाठीवर हात ठेवून तुम्ही लढ म्हणा अशी गर्जना खरंतर गुरुजीनी करायला हवी होती. ते सोडून भलतच...! पोट रिकामे करताना तत्त्वज्ञानाचे पुस्तक वाचता यावे, यासाठी कधी नव्हे ते आधुनिक  संडास सीट बसाविणारे खऱ्या भाविकांसाठी, त्यांचा सोईसाठी काहीतरी करतील अशी आशा ठेवणे म्हणजे गटारात सूर्य उगविणार असे होय..!

nz

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या