( इमेज ai )
सध्या देश्यात गॅस, पेट्रोल,डिझेल यांची टंचाई आहे. या टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच का बसतो? हा खरा प्रश्न आहे. व्यावसायिक वाहनांना हवे तेवढे डिझल देणारे गोंडपिपरीतील पेट्रोलपंप शेतकऱ्यांना मात्र बाहेरचा रस्ता दाखवितात. हे पेट्रोलपंप गोंडपिपरी शहरातील धनिक लोकांचे असल्याने तालुका प्रशासन कुठलीच कार्यवाही करीत नाही. तालुका प्रशासन यांचे गुलाम झाले काय? असे प्रश्न आता उपस्थित केल्या जात आहे.
एकीकडे केवळ शेतीवर नव्हे तर जागतिक हवामानावर एल निनोचा प्रभाव आहे. एल निनोचा थेट परिणाम मान्सूनवर होणार आहे. याची जाणीव असतानाही बळीराजा मोठ्या हिमतीने शेती फुलविण्याचा प्रयत्न करित आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. प्रत्येक शेतात ट्रॅक्टरने नांगरणी आणि इत्तर कामे गेली जातात. मात्र डिझेल मिळत नसल्याने शेती हंगाम रखडला आहे.शेतकरी गेला की डिझेल नाही, असं गोंडपिपरी शहरातील दोन्ही पेट्रोलपंपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. येथे तोंड बघून डिझेल देत असल्याची चर्चा आहे. राजकीय आणि शासकीय कर्मचारी असलेल्या व्यक्तींना हवे तेवढे डिझल दिल्या जाते, असा आरोप आहे. दुसरीकडे सामान्य शेतकऱ्यांना नेहमीच डिझेल नाही, असं सांगितलं जाते, तसा आरोप सुरु आहे.
जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर अन्याय होत असताना तालुका प्रशासनाने ' अर्थपूर्ण ' चुप्पी साधली आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
तालुका प्रशासन शक्तीहीन...
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती, मुरूम यांची तस्करी सुरु आहे. ही तस्करी गावनेते करीत असल्याने तालुका प्रशासनाच्या हातांना लकवा मारला आहे. कार्यवाही झाली तरी ती योजना बद्ध असते, असे बोलले जात आहे. तालुक्याचा इतिहासातील सर्वाधिक कमकुवत प्रशासन सध्याचे असल्याची चर्चा आहे.

0 टिप्पण्या