संतनगरीत सुंगंधित तंबाखू येतो कुठून ? किराणा दुकान झाले तस्करीचे हब




गोंडपिपरी 


संपूर्ण राज्यात भेसळयुक्त पदार्थ आणि बंदी असलेले तंबाखू विक्रीवर आळा बसला आहे. कार्यवाहीचा भीतीने अनेकांनी या धंद्यातून काढता पाय घेतला. काही पान टपरी धारकांनी चाय, भजे विकणे सुरु केले. तश्या बातम्या माध्यमातून आल्या आहेत. असे असताना संतनगरी अशी ओडख असलेल्या धाबा गावातील काही मुजोर किराणा दुकानदार बंदी असलेला तंबाखू विक्री करीत आहेत. पोलिस विभागाने टपरीवर धाड टाकली मात्र किराणा दुकानदारांना सोडले. जेव्हा कि किराणा दुकानातूनच सुगंधित तंबाखूची तस्करी सुरू आहे.विशेष म्हणजे हे किराणा धारक तंबाखूला अधिक भाव घेत असल्याने पान टपरीवाले संतापले आहेत. आता त्यांनीच यांच्या चोर धंद्यावर खुलेआम बोलत आहे.


गावागावातील लहान - मोठ्या किराणा दुकानदारांना चारचाकी वाहनातून किराणा वस्तू पुरविल्या जातात.असे अनेक वाहने धाबा परिसरात फिरत असतात. याच वाहनातून बंदी असलेला तंबाखू पुरविल्या जात असल्याची माहिती आहे. या वाहनात वरवर किराणा सामान दिसत असले तरी त्याच वाहनातून लाखोच्या तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती आहे. यात काही राजकीय पक्ष्यातील व्यक्तींचे नाव पुढे येत आहे. धक्कादायक बाब ही की काही माध्यमसमूहातील व्यक्ती सुद्धा तस्करीत गुंतले असल्याची चर्चा आहे. या प्रकारकाडे संबंधित  विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या