'दादा' वर 'दादू' रुसलेत....




खरंतर कार्यकर्ता कुणाला म्हणावे? हा महत्वाचा आणि तितकाच गंभीर तेने विचार करायला लावणारा प्रश्न. केवळ सतरंजी उचलायची, हाजीहाजी करायचे आणि आपल्या हाडाचे पाणी करून पक्षसाठी मजूर म्हणून राबायचे? असा कार्यकर्ता हवा असेल तर आता मिळणे कठीण? कदाचित मिळेलही मात्र त्याचा हाडाचे पाणी होणार नाही, याची काळजी नेता म्हणवीणाऱ्यांनी घ्यालया हवी. ते त्यांचे कर्तव्य ठरेलं. दुदैव असं कि असे घडताना दिसत नाही. मग या पक्षातून त्या पक्षात उडी मारण्याचे प्रकार सुरु होतात.शोकांतिका अशी कि, त्याचे खापर बिचाऱ्या कार्यकर्त्यावरच फोडले जाते. राजुरा विधानसभा क्षेत्रातील मोठा नेता खरंतर ते घुगुस येथील आहेत. पण सध्या खुर्ची राजुरा विधानसभा क्षेत्राची सांभाळत आहेत.


त्यांच्यावर कार्यकर्ते फारच नाराज असल्याचे दिसते. वाचण्यात आलेल्या बातमीनुसार राजुरा विधानसभा क्षेत्रातील चार तालुक्यातील दादाच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. हे खरं असेल फारच चिंतेची बाब आहे. दादासाठी नाही, पक्ष्यासाठी. पदाधिकारी गेलेत कि त्यांच्यावर ज्यांची श्रद्धा आहे, असे कार्यकर्तेही जाणारच.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हा मोठा धक्का ठरणारा आहे. प्रत्येक नेता कार्यकर्त्यांचा डोक्यावर उभा होऊन मोठा होतो. मात्र आता ही डोके विद्रोह करू लागली आहेत. त्यामुळे दादा कधीही आपटू शकतात.दादांनी आताच माघार घेत कार्यकर्त्यांचे ऐकायला हवे. नाहीतर राजूर्यातून सुरु झालेली गळती कधी चंद्रपूरला पोहचली याचा साधा सांगावा सुद्धा लागणार नाही.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या