नावाचीच बंदी,जड वाहतूकीने कोठारी-तोहोगाव मार्गाचे तीन तेरा : दोन ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प




कोठारी 


कोठारी-तोहोगांव मार्गांवर लाठी पोलीस विभागाने जड वाहतूकीला बंदी घातली आहे. तरीही जड वाहतूक सुरूच आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. सोमवारला ( 5 ऑकटोबर ) या मार्गांवर दोन ट्रक फसले.परिणामी या मार्गांवरील वाहतूक ठप्प पडली होती.दरम्यान नाका चुकविण्यासाठी जड वाहन धारक या मार्गाचा वापर करीत असल्याची माहिती आहे.


कोठारी-तोहोगाव मार्गांवर दोन ट्रक फसलेत. यामुळे या मार्गांवरून ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला.विशेष म्हणजे या मार्गांवरून जडवाहनाना बंदी करण्यात आले आहे. तरीही मोठ्या संख्येने जड वाहन मार्गांवरून ये जा करीत असतात. त्यामुळे लाठी, कोठारी पोलिसांचा कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला जात आहे.


विध्यार्थी अडलेत, मुख्यधापिका धावून गेल्यात 


तोहोगाव परिसरातून मोठ्या संख्येने विध्यार्थी कोठारी, येणबोडी, बह्वारपूर येथे शिक्षणासाठी ये जा करीत असतात. त्यांना शाळेत जाण्यासाठी केवळ एसटी बस हीच मुख्य साधन आहे. मात्र तोहोगाव-कोठारी मार्गांवरील ट्रक फसलाल्याने विध्यार्थी अडले होते. अश्यावेळी कर्मवीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुधा वासाडे यांनी खाजगी बस पाठविली आणि विध्यार्थाना शाळेत आणले.


बससेवा ठप्प 


ट्रक फसले असल्याने या मार्गाने जाणाऱ्या एटी बससेवा ठप्प पडली आहे. सामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठीच पायपिट करावी लागत आहे. दरम्यान या मार्गाने होणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने