' ते ' पुन्हा आलेत, बळीराजा चिंतेत




धाबा 


एकीकडे पावसाने दडी मारल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. डोळ्यासमोर पीक करपताना बघून हिंमत हारलेल्या बळीराजापुढे आता नवे संकट उभे झाले आहे.शेतपिकात वन्यजीवांचा हैदोस वाढला आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्ष दिसेनासे झालेले रानडुक्कर आता कळपाणे शेतपिकांची नासधुस करीत आहेत.


गोंडपिपरी तालुक्यातील बहुतांश शेती जंगलाला लागून आहे. या शेतीला वन्यजीवांचा मोठा त्रास असतो.शेतपिकांपासून वन्यजीवाना दूर ठेवण्यासाठी शेतकरी नानाविध उपाययोजना करीत असतो. मात्र त्या अपुऱ्या पडल्याचे सध्या चित्र आहे. पाऊस नसल्याने कापसाला बोन्ड फारच कमी आहेत. या बोंडावर वन्यजीव तुटून पडले आहेत. त्यात आता रान डुक्करांची भर पडली आहे.रान डुक्करांनी शेतात हैदोस मांडला आहे. एकीकडे वन्यजीवांचा त्रास तर दुसरीकडे वाघाची दहशत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान वनविभागाने प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने